शिवेंद्रसिंहराजे यांनी आज सकाळी अजित पवार यांची बारामतीतील विद्या प्रतिष्ठान संकुलातील व्हीआयआयटीमध्ये भेट घेतली. तेथे बंद खोलीमध्ये शिवेंद्रसिहराजेंनी अजित पवार यांच्याशी पंधरा मिनिटे चर्चा केली. या भेटीनंतर शिवेंद्रसिंहराजे बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठून भेटीबाबत प्रश्न विचारले. मात्र आपण केवळ मतदारसंघातील कामासाठी आलो होतो, त्यात वेगळे काहीही नव्हते असे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
अजित पवार यांची भेट घेण्याची शिवेंद्रसिंहराजे यांची ही पहिलीच वेळ नाही. मागील भेटीत देखील त्यांनी मतदारसंघातील कामासंदर्भात चर्चा केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा अजित पवार यांची त्यांनी भेट घेतल्याने या भेटीमागे काही राजकीय पार्श्वभूमी आहे की केवळ मतदारसंघातील कामाबाबतच ही भेट झाली याबाबत कार्यकर्त्यांमध्येही चर्चा सुरु झाली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यापूर्वी पुणे आणि मुंबई येथे अजित पवार यांची भेट घेतलेली आहे. शिवेंद्रसिंहराजेंची आजची गेल्या काही दिवसांमधील तिसरी भेट आहे. साताऱ्यातील विकासकामांच्या अनुषंगाने त्यांची वाढती जवळीक हा मुद्दा राजकीय वर्तुळात अधोरेखित होत आहे. पवार आणि शिवेंद्रसिंहराजे यांची आजची भेट सातारा जिल्हा बँक आणि सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात देखील असू शकते अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे.
क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times