शेवगाव पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे याची माहिती देण्यात आली. पाथर्डी रोडवर असलेल्या आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत एक महिला पडलेली दिसून आल्याचे दूरध्वनी करणाऱ्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याची नोंद घेऊन घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
एक साठ वर्षीय महिला मृतावस्थेत आढळून आली. तिचे शिर धारदार शस्त्राने कापल्याचे दिसून आले. तेथेच एका दहा ते पंधरा वर्षांच्या मुलाचाही मृतदेह पडलेला होता. या मृतदेहांजवळच घरगुती वापराची भांडी, साहित्य ठेवण्याची लोखंडी पेटी, गोणपाट, झोपडीसाठी लागाऱ्या काठ्या असे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. महिलेचे शिर नसल्याने ओळख पटवणे अवघड झाले आहे. पोलिसांनी आसपास शोध घेतला. मात्र, शिर आढळून आले नाही. नगरहून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून, त्याच्यामार्फत तपास सुरू आहे. शेवगावचे सहायक निरीक्षक विश्वास पावरा, सुजीत ठाकरे, पोलीस नाईक रवी शेळके, सुधाकर दराडे, अच्युत चव्हाण यांचे पथक या घटनेचा तपास करत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times