पुणे: राज्यात कधीही एकत्र येऊ न शकणारे तीन पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नसून मुख्यमंत्री व पक्षप्रमुख यांनी वेळीच ‘बॅक टू पॅव्हेलियन’ म्हणत महायुतीत यावं, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना केलं. ( Union Minister )

वाचा:

शिवसेना आणि या दोन पक्षांनी एकत्र असावं, यासाठी रामदास आठवले नेहमीच आग्रही राहिलेले आहेत. आज पुण्यात बोलताना आठवले यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना हाच आग्रह केला. राज्यातील तीन पक्षांची महाविकास आघाडी फार काळ राहणार नसल्याने उद्धव ठाकरे यांनी आता महायुतीत परतायला हवं. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. यानंतर आणखी एक वर्ष त्यांनी मुख्यमंत्री राहावं आणि त्यापुढची तीन वर्षे भाजपला मुख्यमंत्रिपद द्यावं. ही तीन वर्षे राज्याचे नेतृत्व करतील, असा आमचा प्रस्ताव आहे आणि आग्रहही आहे, असे आठवले यांनी नमूद केले. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुका भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकत्रितपणे लढवणार, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात आठवले म्हणाले.

वाचा:

शेतकरी आंदोलनावरही आठवले यावेळी बोलले. शेतकऱ्यांचे आंदोलन चुकीचे आहे. त्यामुळे शरद पवार यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्याऐवजी कायद्याला समर्थन द्यावे, अशी मागणी आठवले यांनी केली. एल्गार परिषदेला परवानगी देण्यास विरोध नाही. मात्र, या परिषदेच्या व्यासपीठावर नक्षलवादी विचारांच्या व्यक्ती असू नयेत, अशी अपेक्षा यावेळी आठवले यांनी व्यक्त केली. मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आपला विरोध नसल्याचेही एका प्रश्नावर बोलतांना त्यांनी स्पष्ट केले.

वाचा:

सीरम इन्स्टिट्युट मध्ये आग लागली की करोनावरील लसला विरोध करणाऱ्यांनी ही आग लावली, याची चौकशी करण्याची गरज आहे तसेच या आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या पाच कामगारांच्या कुटुंबीयांना नोकरी दिली गेली पाहिजे, असे आठवले यांनी यावेळी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य मंत्री करोनावरील लस घेणार आहेत. तेव्हा मी सुद्धा ही लस घेईन, असे आठवले यांनी स्पष्ट केले. सीरम या जगभरात नावलौकिक असलेल्या कंपनीने ही लस बनवली आहे. त्यामुळे लसला विरोध करणे चुकीचे आहे. लस घ्यायची की नाही ही ऐच्छिक बाब आहे. लस घेतलीच पाहिजे असा काही कायदा नाही. त्यासाठी कुणाची बळजबरीही नाही. ही लस आपल्या आरोग्यासाठी आहे, हे प्रत्येकाने ध्यानात घेण्याची गरज आहे, असेही आठवले म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी लस घेतली नाही तर त्यांच्यावर कुणी सक्ती करणार नाही, असा टोलाही आठवले यांनी लगावला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here