नवी दिल्ली, : भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार टीम पेनवर वाईट वेळ आली आहे. या एका गोष्टीमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वासमोर पेनची अब्रु गेल्याचे म्हटले जात आहे.

पेनच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाच्या संघाला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. हा पराभव पेनच्या जिव्हारी लागलाच, पण त्यानंतर अशी एक वेळ आली की, जगसमोर त्याची लाच गेली. कारण सध्या सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये पेनवर चक्क पाणी आणण्याची वेळ आली. काही दिवसांपूर्वीच पेन हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. पण या लीगमध्ये त्याला पाणक्याची भुमिका बजवावी लागली. त्यानंतर चाहत्यांनी पेनला चांगलेच ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे पनने जे भारतीय संघाबरोबर केले त्याचेच त्याला पळ मिळल्याची भावना यावेळी काही चाहत्यांनी व्यक्त केली आहे

नेमकं घडलं तरी काय, पाहा…बिग बॅश लीगमध्ये पेन हा होबार्टच्या संघाकडून खेळतो. यावेळी होबार्ट आणि सिडनी यांच्यामध्ये सामना सुरु होता. त्यावेळी होबार्टच्या संघातील मऍथ्यू वेड आणि मोइसेस हेनरीक्स हे दोघे फलंदाजी करत होता. त्यावेळी झालेल्या ड्रींक्स ब्रेकमध्ये चक्क पेन पाण्याच्या बाटल्या घेऊन त्यांच्यासाठी गेल्याचे पाहायला मिळाले. पेनची संघात निवड करण्यात आली नाही की त्याला विश्रांती देण्यात आली, हे अजूनपर्यंत समजू शकलेले नाही. पण पेनवर मैदानात पाणी घेऊन जाण्याची वेळ आल्याचे मात्र यावेळी पाहायला मिळाले.

पेनने कसोटी मालिकेत भारताच्या फलंदाजांवर शाब्दिक शेरेबाजी केली होती. भारताच्या आर. अश्विनला तर पेनने ही तुझी अखेरची कसोटी मालिका असेल, असेदेखील म्हटले होते. त्यावर अश्विनने पेनला चोख उत्तर दिले होते. अश्विन यावेळी म्हणाला होता की, या मालिकेनंतर तुझे कर्णधारपद राहील की नाही, हे पहिल्यांदा बघ. त्यानंतर दोघांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले होते. पण पेनच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघाला ब्रिस्बेनमधील सामना गमवावा लागला आणि त्यांच्या हातून मालिका निसटल्याचे पाहायला मिळाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here