मुंबई: अभिनेता यानं त्याची प्रदीर्घ काळाची मैत्रीण हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. आज म्हणजे २४ जानेवारी रोजी ही जोडी अलिबाग इथल्या अलिशान रिसॉर्टमध्ये विविहाबंधनात अडकली. करोनाच्या पाश्वभूमीवर लग्न सोहळ्याला कुटुंबिय आणि काही निवडक मित्रमंडळींनी उपस्थित लावली होती.

गेल्या काही दिवासांपासून बॉलिवूडमध्ये या लग्नाची चर्चा सुरू होती. सर्वातआधी संगीत सोहळा पार पडला. त्यानंतर हळदीचा सोहळा आणि आज लग्न पार पडलं.

बड्या सेलिब्रिटींना आमंत्रण नाहीबिग फॅट वेडिंग न करता लो- प्रोफाइल वेडिंग करण्याचा निर्णय त्यांनी यावेळी घेतला. म्हणूनच या लग्नाला बॉलिवूडच्या अनेक बड्या सेलिब्रिटींना आमंत्रण दिलं नव्हत. अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांच्या कुटुंबियांना वरुणच्या लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं नव्हतं.

वरुण आणि नताशा यांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचं झालं तर, दोघं एकमेकांना लहानपणापासूनच ओळखत आहेत. शाळेत त्यांची मैत्री झाली. यानंतर दोघांच्या कुटुंबियांमध्ये मैत्री झाली. हे स्टार कपल गेल्या वर्षी व्हिएतनाममध्ये लग्न करणार होते. पण कोविड- १९ मुळे त्यांनी लग्न पुढं ढकललं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here