मुंबई महापालिकेचे हे बाँड अन्य सार्वजनिक बाँडप्रणाणेच सेक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)च्या अखत्यारीत असतील. बीएमसीची आर्थिक पत बाजारात चांगली आहे. त्यामुळं आता हे बाँड काढल्यास त्यावर ६ ते ६.५ टक्के व्याज मिळेल, अशी अपेक्षा आहे. या बाँडचा कर्जरोख्यांचा कालावधी १० ते १५ वर्षांचा असेल. मुंबईतील मोठ्या व खर्चिक प्रकल्पांसाठी हा निधी असेल.
वाचा:
मुंबई कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड अशा सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी मुंबई महापालिकेकडं सध्या पुरेसा निधी आहे. मात्र, २०२३ नंतर आर्थिक चणचण भासण्याची शक्यता आहे. सांडपाणी प्रक्रिया व मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी महापालिकेला पैशांची गरज लागेल. या प्रकल्पांचा खर्च ३०० ते १००० कोटीपर्यंत आहे. त्यामुळं आतापासूनच तजवीज करण्याचा विचार सुरू आहे, असं महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. महापालिकेच्या अर्थसंकल्पात बाँडची संपूर्ण तपशील जाहीर केला जाईल. या सगळ्या प्रक्रियेसाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितलं.
वाचा:
अहमदाबाद महापालिकेनं २०१९ मध्ये कर्जरोख्यांच्या माध्यमातून २०० कोटी रुपये उभारले होते. शहरातील पायाभूत विकासावर हे पैसे खर्च करण्यात येत आहेत. पाच वर्षांची कालमर्यादा असलेल्या या रोख्यांवर ८.७ टक्के व्याज दिलं जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times