नवी दिल्ली : भागात सुरू असलेल्या तणावादरम्यान भारत आणि चीन दरम्यान कमांडर स्तरावरची नववी (India China 9th round Talk) रविवारी पार पडली. तब्बल १५ तास चाललेली ही बैठक रविवार-सोमवारच्या रात्री जवळपास २.३० वाजता संपली.

भागात रविवारी सकाळी जवळपास ९.३० वाजता ही बैठक सुरू झाली होती. या बैठकीत भारताकडून सेनेच्या १४ कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन आणि चीनकडून दक्षिण शिनजियांग मिलिट्री रीजन कमांडर मेजर जनरल लियू लीन यांनी सहभाग घेतला.

यापूर्वी ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या आठव्या टप्प्यातील चर्चेत दोन्ही पक्षांनी संवेदनशील ठिकाणांहून सैनिकांच्या मागे हटवण्यावर व्यापक चर्चा पार पडली होती. डोंगराळ भागात वाद उद्भवणाऱ्या ठिकाणांवरून आपले सैनिक माघारी बोलावण्याची प्रक्रिया पुढे सरकावणं आणि तणाव कमी कमी करणं ही चीनची जबाबदारी आहे, असं भारताचं म्हणणं आहे.

उल्लेखनीय म्हणजे पूर्व लडाखमध्ये वेगवेगळ्या उंचीवरच्या भागांत भारतीय सेनेचे कमीत कमी ५० हजार जवान युद्धाच्या तयारीसोबत तैनात आहेत. वादग्रस्त मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान अनेक टप्प्यांत चर्चा पार पडलीय परंतु, अद्याप कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चीनकडूनही एवढीच मोठी फौज सीमेवर तैनात आहे.

गेल्या महिन्यात भारत आणि चीनकडून आपापल्या सीमांवर WMCC (Working Mechanism for Consultation and Coordination) अंतर्गत आणखीन एक राजनायिक स्तरावर चर्चा पार पडली होती, परंतु यामध्येही कोणताही तोडगा निघाला नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here