म. टा. प्रतिनिधी,

अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट समोर आल्यानंतर ”च्या (एनसीबी) पथकाने मुंबईपाठोपाठ शनिवारी पुण्यातील हडपसर व खडकवासला परिसरात छापे टाकले. बॉलिवूडमधील अनेकांना अमली पदार्थ पुरविणाऱ्या व आरीफ भोजवाल यांच्या पुण्यातील सहकाऱ्याच्या घरासह गोडाउनवर छापे टाकल्याचे समोर आले आहे.

सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक अमली पदार्थ तस्करांची नावे समोर आली होती. त्यामध्ये बॉलिवूडमधील कलाकारांना अमली पदार्थ पुरविणाऱ्यांबरोबच काही कलाकारांचीदेखील चौकशी करण्यात आली होती. याच प्रकरणात चिंकू पठाण व त्याचा साथीदार आरीफ भोजवाल यांची नावे समोर आली होती. ‘एनसीबी’च्या पथकाने दोघांनाही अटक करून अमली पदार्थ तस्कराच्या मुसक्‍या आवळण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या चौकशीमध्ये राजू सोनावणे हा त्यांचा साथीदार असून त्याची अमली पदार्थ तस्करीमध्ये महत्त्वाची भूमिका असल्याची माहिती ‘एनसीबी’ला मिळाली होती. सोनावणे याचे खडकवासला येथील घर आणि हडपसरमधील गोडाउनवर ‘एनसीबी’ने छापे टाकले. पठाण व भोजवाल या दोघांना अटक झाल्यानंतर सोनावणे पळून गेला आहे. त्याच्या घरात महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. तो कर्नाटकमधून फळे, धान्याची वाहतूक करताना अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई ‘एनसीबी’च्या पथकाने ही कारवाई केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here