नवी दिल्ली : बजाज प्लॅटिना शहरापासून ते छोट्या-छोट्या गावांपर्यंत लोकप्रिय आहे. कंपनी गेल्या एक वर्षांपासून परवडणारी दुचाकी सीटी १०० वर काम करत होती. चाचणी करतानाही ही दुचाकी दिसून आली होती. कंपनीने आता बजाज सीटी १०० आणि बजाज प्लॅटिना या दोन मध्यम किंमतीच्या दुचाकी नव्या व्हेरिएंटमध्ये लाँच केल्या आहेत. दोन्ही दुचाकी बीएस ६ उत्सर्जन मानकांची पूर्तता करणाऱ्या इंजिन व्हेरिएंटमध्ये आहेत. बीएस ४ इंजिनच्या तुलनेत हे नवीन मॉडेल ७ हजार रुपयांनी महाग आहे.

बजाज सीटी १०० च्या बीएस ६ व्हर्जनची किंमत ४० हजार ७९४ रुपयांपासून पुढे आहे. यापूर्वी ही किंमत ३३ हजार ४०२ रुपये होती. तर बीएस ६ प्लॅटिनाची किंमत ४७ हजार २६४ रुपयांपासून पुढे आहे. किक स्टार्ट मॉडलची ही किंमत आहे. सेल्फ स्टार्ट मॉडलची किंमत ५४ हजार ७९७ रुपये आहे.

या दोन्ही दुचाकींमध्ये इलेक्ट्रॉनिक इंजेक्शन सिस्टम असल्याचंही कंपनीने सांगितलं आहे. यामुळे जास्तीत जास्त मायलेज मिळण्यास मदत होते. शिवाय मेंटेनन्सही सुलभ होतं. दोन्ही दुचाकींच्या लूक आणि डिझाईनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

या दुचाकीमध्ये पहिल्याप्रमाणेच १०२ सीसी सिंगल सिलिंडर एअर कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. इंजिन पॉवर आऊटपुट आणि टॉर्क पहिल्याप्रमाणेच ७.७ बीएचपी आणि ८ एनएम आहे. ४ स्पीड गिअरबॉक्समध्येही बदल करण्यात आलेला नाही. या दोन्ही दुचाकीनंतर कंपनी पुढच्या काही आठवड्यात इतर दुचाकीही बीएस ६ व्हेरिएंटमध्ये लाँच करणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here