बीजिंग/नवी दिल्ली: भारत-चीन दरम्यान लडाखमध्ये तणाव सुरू असताना चिनी सैन्याकडून इतर ठिकाणीही घुसखोरी सुरू आहे. सिक्किमध्ये ही मागील आठवड्यात चिनी सैन्याना नाकू ला भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी हा डाव हाणून पाडला. दोन्ही बाजूचे सैन्य जखमी झाले असल्याची माहिती आहे. या संघर्षात शस्त्रांचा वापर झाला नाही.

चिनी सैन्याने सिक्कीममधील नाकू ला भागात घुसखोरी करत सीमा रेषेवरील सध्याची स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. चीनचे काही सैन्य भारतीय क्षेत्रात येत असल्याचे जवानांना दिसले. त्यानंतर भारतीय जवानांनी चिनी सैन्याला या भागातून हुसकावून लावले. इ़ंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून या संघर्षात चार भारतीय जवान जखमी झाले असून २० चिनी जवान जखमी झाले आहेत. सध्या सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण असून स्थिर आहे.

वाचा:

भारत-चीनमध्ये १५ तास चर्चा

भागात सुरू असलेल्या तणावादरम्यान भारत आणि चीन दरम्यान कमांडर स्तरावरची नववी
रविवारी पार पडली. तब्बल १५ तास चाललेली ही बैठक रविवार-सोमवारच्या रात्री जवळपास २.३० वाजता संपली.
भागात रविवारी सकाळी जवळपास ९.३० वाजता ही बैठक सुरू झाली होती. या बैठकीत भारताकडून सेनेच्या १४ कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन आणि चीनकडून दक्षिण शिनजियांग मिलिट्री रीजन कमांडर मेजर जनरल लियू लीन यांनी सहभाग घेतला.

यापूर्वी ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या आठव्या टप्प्यातील चर्चेत दोन्ही पक्षांनी संवेदनशील ठिकाणांहून सैनिकांच्या मागे हटवण्यावर व्यापक चर्चा पार पडली होती. डोंगराळ भागात वाद उद्भवणाऱ्या ठिकाणांवरून आपले सैनिक माघारी बोलावण्याची प्रक्रिया पुढे सरकावणं आणि तणाव कमी कमी करणं ही चीनची जबाबदारी आहे, असं भारताचं म्हणणं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here