आंदोलनाचे Live Updates:
>> आझाद मैदानातील आंदोलनाला ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणणाऱ्या रामदास आठवले यांनी माफी मागावी, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
>> राज्यपाल भगतसिंह कोश्यारी संध्याकाी ५ वाजता शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटणार
>> शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनावर धडकणार. शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून निवेदन देणार
>> दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ट्रॅक्टर मोर्चा सुरू. सांगली ते कोल्हापूर निघणार ट्रॅक्टर मोर्चा
>> मोर्चाच्या निमित्तानं आझाद मैदाना बुक स्टॉल. कृषी कायदे, संविधान व इतर पुस्तकांची मेजवानी
>> राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील मोर्चात सहभागी होणार
>> दादर येथील गुरुद्वाराच्या वतीने अन्न व खाद्य पदार्थाचे वाट
>> आझाद मैदानात आंदोलकांसाठी महापालिकेच्या वतीनं वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला आहे.
>>
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या: केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, करोना काळात राज्य सरकारनं स्थगित केलेली महात्मा फुले कर्ज माफी योजना पुन्हा सुरू करावी, वनाधिकार खात्याची अंमलबजावणी करण्यात यावी
>> राज्यातील विविध शेतकरी संघटनांचा सहभाग. महाविकास आघाडीतील पक्षांचाही मोर्चाला पाठिंबा
>> दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times