राष्ट्रवादीचे आमदार हे सातत्याने सरकारची बाजू मांडताना दिसत आहेत. शेतकरी आंदोलनाबाबतही त्यांनी अनेकदा आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्याचाच आधार घेत निलेश राणे यांनी रोहित पवारांवर हल्लाबोल चढवला आहे.
‘नकलीपणा काय असतो बघायचं असेल तर हे वाचा. जे रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत आहेत,’ असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे. त्याचबरोबर, रोहित पवारांच्या कंपनीच्या पोस्टरचा एक फोटोही शेअर केला आहे.
पोस्टरमध्ये काय लिहलंय?
करार पद्धतीने शेती करण्याचे फायदे
वर्षभर हमी भावाने खरेदी
शेतकऱ्याला क्रेडीटवर बेबीकॉर्न बियाणे व मिरची रोपे याचा पुरवठा
शुन्य टक्के वाहतूक
विविध पिकांसाठी तज्ञांद्वारे प्लॉट व्हिजीट व मार्गदर्शन
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times