वाचा:
सचिन सावंत यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. अर्णव गोस्वामी यांच्याकडून मला हॉलिडे पॅकेजपोटी १२ हजार अमेरिकी डॉलर मिळाले होते. तर, तीन वर्षांत एकूण ४० लाख रुपये मिळाले होते, अशी कबुली दासगुप्ता यानं पोलिसांकडं दिल्याचं या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यावरून सचिन सावंत यांनी भाजपला टोला हाणला आहे.
वाचा:
‘टीआरपी घोटाळ्यात अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात स्पष्ट पुरावे हाती आले आहेत. असं असतानाही भ्रष्टाचारी अर्णव यांच्याविरोधात कारवाईची मागणी भाजप का करत नाही? देशाला याचं उत्तर हवं आहे,’ असं सावंत यांनी म्हटलं आहे. ‘मोदी सरकार अर्णवला संरक्षण का देत आहे? तो भाजपचा कार्यकर्ता असल्यानं त्याला पाठिशी घातलं जातंय का? त्याला बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती कोणी पुरवली?,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. अर्णव गोस्वामी यांना ताबडतोब अटक करून रिपब्लिक टीव्हीवर कारवाई करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times