म.टा. प्रतिनिधी, नगर: ‘निलेश राणे यांनी माझ्या बाबतीत ट्विट केले आहे, मात्र मी त्यांना रिप्लाय दिला नाही. पण एवढेच सांगतो की आपण लिहीत असताना योग्य अभ्यास करणे गरजेचे आहे,’ असा पलटवार राष्ट्रवादीचे आमदार यांनी भाजप नेते यांच्यावर केला आहे. ते नगरमध्ये बोलत होते.

केंद्राच्या कृषी कायद्यावरून भाजप नेते निलेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. निलेश राणे यांनी रोहित पवार यांच्या कंपनीच्या पोस्टरचा एक फोटो शेअर करत रोहित पवार यांना नकली म्हटले होते. मात्र या टट्विटरचा समाचार घेताना रोहित पवार यांनी राणे यांच्यावर तोफ डागली आहे.

पवार म्हणाले की, ‘राणे यांनी घाईघाईने ट्विट केले असे मला वाटते. कारण मी चार डिसेंबरला या कृषी कायद्याच्या बाबतीत काही गोष्टी लिहिल्या होत्या. या गोष्टी आपण वाचल्या तर त्यामध्ये हे लिहिले होते की करार शेती हा विषय योग्य पद्धतीने केला तर ती चांगली गोष्ट आहे. त्याला आपण विरोध करू शकत नाही. पण आता जे कायदे आले आहेत, त्या कायद्यामध्ये एक नियम असा आहे की समजा शेतकरी व एखाद्या कंपनीत करार झाला व त्या करारातून शेतकऱ्याला बाहेर पडायचे असेल तर त्यासाठी दोन्ही पार्टीची मान्यता असणे गरजेचे आहे, असं स्पष्टीकरण रोहित पवारांनी दिलं आहे.

वाचाः

‘मुळात एखादी गोष्ट जर कोणी बोलत असेल, बातमी येत असेल, तर त्याचा अभ्यास करून ती समजून घेण्याची गरज असते. माझ्या लिखाणात सर्व गोष्टी मी लिहिल्या आहेत. मी करार शेती असेल किंवा शेती विषयात काम करतो. माझा तो अनेक वर्षापासून व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना काय अडचणी येतात, शेतकरी हित कशात आहे, हे आम्ही सांगत असतो. माझ्याकडे अजिबात लपवाछपवी नसते,’ असा टोलाही त्यांनी राणे यांना लगावला आहे.

वाचाः

‘माझी एक पद्धत आहे. मी एखादा विषय हा अभ्यास करून मांडतो. माझी जशी पद्धत आहे, तशी त्यांची एखादी पद्धत असेल. त्यावर मी काही बोलू शकत नाही. पण आपण लिहित असताना त्याचा अभ्यास करावा, असा टोलाही रोहित पवार यांनी राणेंना लगावला आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here