नवी दिल्ली:
आतापर्यंत आपण जमिनीवरून आणि अंडरग्राउंड धावणारी पाहिली आहे. पण लवकरच भारतात अंडरवॉटर मेट्रोदेखील धावणार आहे. कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन () लवकरच हुगळी नदीखालून धावणारी मेट्रो प्रत्यक्षात आणणार आहे. ईस्ट-वेस्ट प्रोजेक्टवर काम जोमाने सुरू आहे आणि २०२० च्या मार्च महिन्यापर्यंत हे काप पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जापानने दिला ४८.५ टक्के निधी

KMRC चे व्यवस्थापकीय संचालक मानस सरकार म्हणाले की आम्हाला केंद्रीय रेल्वे बोर्डाकडून अंतिम टप्यातील २० कोटी रुपयांचा निधी मिळण्याची प्रतीक्षा आहे. या प्रकल्पातील ४८.५ टक्के फंडिंग जापान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून देण्यात आलं आहे.

८,६०० कोटींमध्ये तयार झाला प्रकल्प

भारतात सर्वात आधी कोलकात्यात १९८४ मध्ये मेट्रोची सुरुवात झाली होती. ही नॉर्थ-साउथ मेट्रो होती. ईस्ट-वेस्ट मेट्रोसाठी सुरुवातीला ४,९०० कोटी रुपये खर्च आला आणि हा टप्पा १४ किलोमीटर लांब होता. नंतर या प्रकल्पाला झालेला विलंब आणि अंतरात झालेला बदल पाहता प्रकल्पाचा खर्च ८,६०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. आता १४ ऐवजी १७ किलोमीटर लांब मार्ग बनत आहे.

दररोज ९ लाख प्रवासी

KMRC ला अपेक्षा आहे की दररोज सुमारे ९ लाख प्रवासी नव्या मेट्रोने प्रवास करतील. हे प्रमाण कोलकात्याच्या एकूण लोकसंख्येच्या २० टक्के आहे. हुगळीच्या वॉटर टनेलची लांबी सुमारे ५२० मीटर आहे. हा बोगदा पार करण्यासाठी दोन मिनिटांचा अवधी लागणार आहे. KMRC फंडिंग करणारी कंपनी JICA ला पुढील ३० वर्षे परतफेड करणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here