(नवी मुंबई) : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर () दुरुस्तीचे काम पाहणाऱ्या एका इंजिनीअरचा दुरुस्तीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या रोलरखाली चिरडून मृत्यू झाला आहे. मनोज जगदाळे असे मृत इंजिनिअरचे नाव आहे. जगदाळे २४ वर्षांचे होते. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. अपघात झाल्यानंतर रोलर चालक घटनास्थळावरुन पळून गेला. या प्रकरणाचा तपास रसायनी पोलिस करत आहेत. (the engineer crushed to death by the roller on mumbai pune express way)

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर दोन्हीकडील बाजूंना भेगा पडल्या आहेत. या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा ताण मोठा आहे. अपघात टाळता यावेत म्हणून दोन्ही बाजूंकडील दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आले आहे. या भेगा दोन्ही बाजूंच्या चौथ्या लेनवर भेगा पडल्या आहेत. या दुरुस्तीच्या कामाची पाहणी करण्यासाठी जगदाळे आले होते. मात्र, रस्त्याची दुरुस्ती करणाऱ्या रोलरखाली येऊन जगदाळे यांचा मृत्यू झाला. फरार झालेल्या रोलर चालकाचा रसायनी पोलिस शोध घेत आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे. खोपोली के पुसगाव येथील नवीन मार्गिकेचे कामही जोरात सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच या कामाची पाहणी देखील केलेली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली ते खंडाळादरम्यान केबल स्टड पूलही उभारण्यात येत आहे. हा पूल पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. या पूलामुळे प्रवासाला लागणारा वेळही कमी होणार आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here