ठाणेः कल्याणमधील वाहतूककोंडी फोडणाऱ्या पत्रीपुलाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालं. पत्रीपुलाचं उद्घाटन होताच त्याच्या नामकरणाच्या चर्चांनाही वेग आलं आहे

कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा पत्रीपुल सुमारे १०४ वर्षे जुना आहे. पूल धोकादायक बनल्यानं रेल्वे मार्गावरुन जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना धोका निर्माण होऊ शकतो, हे गृहित धरुन तो पाडण्यात आला. पुल पाडल्यामुळं कल्याण- शिळफाटा परिसरात वाहतूक कोंडीनं नागरिक त्रस्त झाले होते. त्यानंतर खासदार यांनी पाहणी करत पुलाचं बांधकाम लवकरात लवकर बांधण्याचे आश्वासन दिलं आहे. पत्रीपुल प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी सुमारे ३४ कोटींचा खर्च झाला असून आज या पुलाचे उद्घाटन करण्यात आलं आहे. त्यावेळी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रीपुलाच्या नामकरणाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

‘पत्रीपुलाचं नाव ग्रामदेवता श्री तिसाई आई देवीच्या नावावर आहे. त्यामुळं पुलाचं जर नामकरण होत असेल तर या पुलाला इतर कोणतही नाव देता येणार नाही, असं मला वाटतं. त्यामुळं आजपासून आपण याला पत्रीपुल बोलणं बंद करुन आई तिसाई देवी उड्डाणपूल बोलण्यास आपण सर्वांनी सुरुवात केली आहे पाहिजे,’ असं आवाहन श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे. त्याचबरोबर, ‘आधीचा पत्रीपुल १०४ वर्ष जुना होता आणि आज या पुलाचं उद्घाटन झालं तो १०० वर्ष टीकेल,’ असंही ते म्हणाले आहेत.

कल्याण व डोंबिवली शहरांतर्गत वाहतुकीच्या दृष्टिने अतिशय महत्वाचा असलेला हा पूल नागरिकांकरिता खुला झाल्याने आता पूल परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे, असं ही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here