कल्याण-डोंबिवली येथील पत्री पुलाच्या उद्घाटनानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलत होते. या वेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतल्याचे सांगितले. किसान मोर्चाकडे कोणी फिरकले की नाही, हा विचार करण्यापेक्षा केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनाची किती दखल घेतली याकडे आपल्याला लक्ष केंद्रीत करायला हवे असे ठाकरे म्हणाले. आज ६० दिवस झाले, तरी देखील केंद्र सरकारने शेतकऱ्यांची दखल घेतलेली नाही. याबाबत आपण प्रश्न विचारायला हवा. शरद पवार हे महाविकास आघाडीकडून नेतृत्व करत आहेत. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील याबाबत बोलले असल्याचे ठाकरे पुढे म्हणाले.
कल्याण- डोंबिवली या शहरांना जोडणाऱ्या पत्री पुलाचे आज उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या पुलाचे लोकार्पण केले. या पुलामुळे लोकांचा प्रवास सुकर होणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
शरद पवारांची राज्यपालांवर टीका
दरम्यान, शेतकरी आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. कंगना रणौतला भेटण्यासाठी राज्यपालांना वेळ आहे, मात्र आमच्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. असे राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिले नाहीत, अशा शब्दांत पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांना टोला हाणला आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times