मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते (Eknath Khadse) यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी २८ जानेवारीला होत आहे. तो पर्यंत खडसे यांना अटक करणार नाही, अशी माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या () वकिलांनी मुंबई हायकोर्टाला सांगितले. यामुळे एकनाथ खडसे यांना २८ जानेवारीपर्यंत दिलासा मिळाला आहे. ईडीने आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका खडसे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी झाली.मात्र ही सुनावणी पूर्ण होऊ न शकल्याने ती आता २८ जानेवारीला होत आहे. ( will not be arrested till January 28 says )

ईडीने एकनाथ खडसे यांना पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात समन धाडले होते. याबरोबरच ईडीने खडसेंकडून काही प्रश्नांची उत्तरेही मागितली होती. मात्र, त्यावेळी आपल्याला समन मिळाले नसल्याचे खडसेंनी सांगितले होते. जेव्हा आपल्याला समन मिळतील तेव्हा आपण सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ, असे खडसेंनी सांगितले होते. भारतीय जनता पक्ष सूडबुद्धीने ही कारवाई करत असल्याचा आरोप त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अंकुश काकडे आणि अमोल मिटकरी यांनी केला होता. एकनाथ खडसे हे एक शक्तीशाली नेते असून ते भारतीय जनता पक्षाला पुरून उरतील असेही या नेत्यांनी म्हटले होते.

क्लिक करा आणि वाचा-
एकनाथ खडसे यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये भारतीय जनता पक्ष सोडला होता. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. जर आपल्यामागे कोणी ईडी लावली तर मी सीडी लावेन असे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळी खडसे म्हणाले होते. ईडीची नोटीस मिळाल्यानंतर मात्र खडसेंनी सीडीचा उल्लेख केला नव्हता.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here