‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद नेमाडे () यांच्या विरोधात जळगाव जिल्ह्यातील जामनेर पोलीस ठाण्यात आज सोमवारी दुपारी दाखल करण्यात आला आहे. ‘हिंदू : जगण्याची समृध्द अडगळ’ () या कादंबरीत लभान गोरबंजारा समाजातील महिलांबाबत अपमानजनक व आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याची तक्रार राष्ट्रीय बंजारा टायगर्सने () केली होती.
अॅड. भरत पवार यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन ही नोंद करण्यात आली आहे. यांना दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्याची मागणी देखील एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या पदाधिकाऱ्यांनी जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना एक निवेदन दिले आहे. त्यात सदर मागणी केली आहे. तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर जामनेरच्या पोलीस निरीक्षकांना देखील निवेदन देण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा-
पुस्तकाचे प्रकाशक हर्ष भटकळ यांच्याविरोधात देखील गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. अॅड. भरत पवार यांच्या तक्रारीनुसार भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रीय बंजारा टायगर्सने भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू कादंबरीतील लिखाणाला आक्षेप घेत तक्रार केली. त्यानुसार, नेमाडे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती जामनेर पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times