सांगली: सांगलीतून निघालेला कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार यांनी गंभीर विधान केले आहे. दिल्लीत उद्या होणाऱ्या शेतकरी संचलनामध्ये आंदोलनाला बदनाम करण्यासाठी घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असे शेट्टी म्हणाले. शेतकरी दक्ष आहे. असले कोणतेही कारस्थान करण्याचे प्रयत्न झाले तर महागात पडेल इतकेच ध्यानात ठेवा, असा इशाराही शेट्टी यांनी दिला. ( )

वाचा:

रद्द करा आणि माफ करा या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढली. सांगलीतून सुरू झालेल्या रॅलीची सांगता कोल्हापुरातील दसरा चौकात झाली. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. नवीन कृषी कायदे त्वरित मागे घ्यावेत या मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मारून बसले असताना मोदी सरकार सत्तेच्या जोरावर आंदोलन दडपू पाहात आहे मात्र, कोणत्याही स्थितीत हे कायदे आम्ही लागू होऊ देणार नाही. यासाठी प्रत्येक राज्यातून शेतकरी रस्त्यांवर येत आहेत. वेळप्रसंगी आम्हीही शेतकऱ्यांची फौज घेऊन दिल्लीवर चाल करू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

वाचा:

केंद्र सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे हित सरकारला नको आहे. केवळ उद्योगधार्जिणे धोरण आखून शेतकऱ्यांच्या अन्नात विष कालविण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. अशावेळी शेतकरी उद्ध्वस्त होवू नये, यासाठी देशातील शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत, असेही राजू शेट्टी म्हणाले. राज्य सरकारने करोना कालावधीतील वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली होती, मात्र आता वीजबिल न भरल्यास कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे, असे सांगत वीज बिल माफ करण्याची मागणीही शेट्टी यांनी केली.

वाचा:

विश्रामबाग चौकातून ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात झाली. सकाळपासून आंदोलनाच्या ठिकाणी ट्रॅक्टर आले होते. सांगलीपासून सुरू झालेल्या मोर्चामध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते. कोल्हापुरातील दसरा चौकात ट्रॅक्टर रॅलीची सांगता झाली. यावेळी स्वाभिमानीचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे, पोपट मोरे, संजय बेले, संदीप राजोबा, बाबा सांद्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here