मुंबई: राज्यातील एकूण ४७७ केंद्रांवर आज तब्बल ३५ हजार ८१६ ( ७४ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना () करण्यात आले. राज्यात आज धुळे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजेच १४४ टक्के लसीकरण झाले. त्या पाठोपाठ वर्धा, भंडारा, उस्मानाबाद, सातारा या जिल्ह्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले आहे. (35 thousand 816 employees were vaccinated in the state today)

राज्यात आजपासून लसीकरण सत्राला सुरवात झाली असून उद्या मंगळवार वगळता पाच दिवस लसीकरण सत्र होणार आहे. दरम्यान, ३१ जानेवारीला पोलिओ लसीकरण असल्याने ३० जानेवारीचे कोरोना लसीकरण सत्र होणार नाही.

आज सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख ३५ हजार ७०१ जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली. तसेच राज्यात आज २६५ जणांना लस देण्यात आली आहे.

आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी (कंसात दैनंदिन लसीकरण झालेले कर्मचारी, टक्के आणि आतापर्यंतची एकूण संख्या)

अकोला (३२७, ६५ टक्के, १४३३), अमरावती (८५७, ८६ टक्के, ३२४३), बुलढाणा (८०४, ८० टक्के, २९२१), वाशीम (४४२, ८८ टक्के, १५७३), यवतमाळ (३५५, ७१ टक्के, २१४३), औरंगाबाद (८१६, ४८ टक्के, ३९५९), हिंगोली (२३७, ७९ टक्के, १५७३), जालना (७६०, ९५ टक्के, २४४५), परभणी (२७५, ५५ टक्के, १५९७), कोल्हापूर (१०९७, ५५ टक्के, ४६०१), रत्नागिरी (४८७, ५२ टक्के, १९४२), सांगली (१३२६, ७८ टक्के, ४०६५), सिंधुदूर्ग (३५४, ५९ टक्के, १२६४), बीड (७४६, ८३ टक्के, ३००८), लातूर (९७४, ७५ टक्के, ३०८१), नांदेड (३८५, ४३ टक्के, २०६२), उस्मानाबाद (३१९, १०६ टक्के, १६२०), मुंबई (१८५८, ६४ टक्के, ६६२४), मुंबई उपनगर (३१४७, ९३ टक्के, १०५४०), भंडारा (५६५, ११३ टक्के, १८०३), चंद्रपूर (३९२, ६५ टक्के, २५६९), गडचिरोली (६४५, ९२ टक्के, २२१५), गोंदिया (५३०, ८८ टक्के, १७९७), नागपूर (१३४४, ६१ टक्के, ६१११), वर्धा (१३१५, १२० टक्के, ३९६०), अहमदनगर (१३३४, ६४ टक्के, ५२४०), धुळे (८६४, १४४ टक्के, २७५५), जळगाव (८६७, ६७ टक्के, ३४३७), नंदुरबार (३४७, ५० टक्के, १८२२), नाशिक (१५१७, ६६ टक्के, ५९९१), पुणे (२९०३, ६५ टक्के, ११,१८८), सातारा (१४१९, १०१ टक्के, ४८९१), सोलापूर (९६७. ५१ टक्के, ५५७०), पालघर (१०१६, ८५ टक्के, २६०६ ), ठाणे (३९०४, ९५ टक्के, १३,१०९), रायगड (३२१, ४० टक्के, १३०३)

क्लिक करा आणि वाचा-
राज्यात सहा ठिकाणी कोवॅक्सीन लस देण्यात येत आहे. त्यातील अमरावती जिल्ह्यात आज ८० जणांना, पुणे येथे ३५, मुंबई ३४, नागपूर ६८, कोल्हापूर २६ आणि औरंगाबाद २२ असे २६५ जणांना ही लस देण्यात आली.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here