भारतीय जनता पक्षाचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गेल्या रविवारी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. शिवेंद्रसिंहराजे यांनी गेल्या महिनाभरात अजित पवार यांची घेतलेली ही तिसरी भेट आहे. शिवेंद्रसिंहराजेंनी अजित पवार यांची वारंवार भेट घेतल्याने ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असल्याची चर्चाही आहे.
‘केंद्र सरकारने कायदे राज्यावर लादले’
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शेतकऱ्यांच्या आदोलनांवर देखील भाष्य केले आहे. केंद्र सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, ‘सरकार जसे कायदे करू शकते तसे ते रद्दही करू शकते. मात्र, लोकशाहीमध्ये जनतेच्या हिताचे कायदे केले गेले पाहिजेत. यासाठीच शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला डाव्या विचारसरणीचे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलाय. केंद्र सरकारने कृषी कायदे राज्यांवर लादण्याचे काम केले आहे.’
क्लिक करा आणि वाचा-
केंद्र सरकारने तयार केलेले कृषी कायदे दीड वर्षासाठी स्थगित करू असे केंद्र सरकार सांगत आहे. मात्र सरकारला जर नवे कायदे करायचे असतील तर शेतकऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. आम्ही जे करू तेच स्वीकारले गेले पाहिजे अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका आहे आणि आमचा याला विरोध आहे, असे नवाब मलिक म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times