या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज रुळे गावच्या ग्रामदैवतेच्या यात्रेचा दिवस होता. यात्रा साजरी होणार नसली तरी देवदर्शन करण्यास लोकांना परवानगी देण्यात आलेली होती. दोन तरुणांपैकी मृत पावलेला सुशांत कदम हा मुंबईवरून यात्रेसाठी गावी आला होता. त्याचा मित्र अनिकेत हा जनावरे चरायला घेऊन निघाला होता. त्याच्या सोबत आपणही जावे असा विचार करून सुशांत अनिकेतसोबत निघाला. जनावरे शिवसागर जलाशयाकाठी चरत असताना दोघे पोहण्यासाठी कोयना नदीत उतरले. अनिकेत हा कायम गावातच राहत असल्याने त्याला पोहायला येत होते. सुशांतला मात्र पोहणे येत नव्हते. सुशांतला पोहायला येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. यावेळी अनिकेत त्याला वाचवण्यासाठी सरसावला. मात्र, त्याच वेळी सुशांतने त्याला मिठी मारली. त्यामुळे दोघेही बुडाले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
क्लिक करा आणि वाचा-
बराच उशीर झाला तरी मुले घरी का आली नाहीत, असा विचार करून घरातील, तसेच गावातील लोकांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी नदीच्या काठावर दोघांचे कपडे दिसले. त्यावरून दोघेही बुडल्याचे स्पष्ट झाले. गावातील दोन मुले बुडल्याने रुळे ग्रामदैवता यात्रेचे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. दरम्यान, अद्यापही दोघांचे मृतदेह सापडले नसल्याने शोधकार्य सुरू आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times