नागपूर: डोळ्यादेखत पोटच्या पोराने जग सोडावे यापेक्षा मोठे दु:ख कदाचित या जगात नसेल. अशीच एक घटना जिल्ह्यात घडली. सहलीला गेलेल्या एका १३ वर्षीय मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला. पालकांच्या डोळ्यादेखतच ही घटना घडली. सगळे प्रयत्न करूनही त्याला वाचविण्यात अपयश आले. त्यामुळे त्याचे पालक जबर मानसिक धक्क्यात आहेत. ( )

वाचा:

(वय १३) असे या मृत मुलाचे नाव आहे. तो नागपुरातील लष्करीबाग येथील रहिवासी होता. ही घटना ठाण्याच्या हद्दीतील परिसरात घडली. श्रीवास कुटुंबीय त्यांच्या नातेवाईकांसोबत घोगरा महादेव घाट येथे सहलीसाठी आले होते. शिवराज यांचा मुलगा अनुरागसुद्धा त्यांच्यासोबत आला होता. यावेळी सगळेच घोगरा घाट येथील मध्ये आंघोळीसाठी उतरले. अनुरागही नदीत उतरला. मात्र, तो नदीच्या पाण्यात बुडला.

वाचा:

तिथे उपस्थित असलेल्या पोहणाऱ्यांनी अनुरागला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याला काही वेळातच पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. तातडीने जवळच्याच रुग्णालयात त्याला भरतीही करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे श्रीवास कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी तूर्तास याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here