गेली ६० वर्षे जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या लिज्जत पापडला घराघरात पोहोचवून जसवंतीबेन पोपट यांनी श्री महिला गृहउद्योगाला बळ दिलं आहे. जसवंतीबेन यांच्या कर्तृत्वाची सरकारनं दखल घेतली आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये त्यांच्या नावाची घोषणा झाली.
‘लिज्जत पापड’ची यशोगाथा
मार्च १९५९मध्ये मुंबईत गिरगावातील सात महिलांनी ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ या पापड तयार करण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. केवळ महिलाच सहमालक असणारा हा जगातील एकमेव गृहउद्योग आहे. सात गृहिणींनी ८० रुपयांच्या भांडवलासह सुरू केलेला पापड उद्योग आज सोळाशे कोटींहून अधिक रुपयांच्या घरात पोहोचला आहे. ‘कर्रम् कुर्रम् कुर्रम् कर्रम्’ हा मंत्र जपत लिज्जत पापडने ६० वर्षांचा प्रवास यशस्वीपणे पार केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times