नवी दिल्लीः प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात ( ) मंगळवारी देशाचे सैन्य सामर्थ्य तसेच सांस्कृतिक वारशाची झलक पहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच भारतीय संचलनात राफेल या अत्याधुनिक लढाऊ विमानांसह टी -९० रणगाडे, समविजय इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, सुखोई -30 एमकेआय लढाऊ विमानांसह आपल्या सैन्य शक्तीचे प्रदर्शन करेल.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राजपथावर १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ, संरक्षण मंत्रालयाचे सहा चित्ररथ, इतर केंद्रीय मंत्रालये आणि निमलष्करी दलाच्या ९ चित्ररथांसह ३२ चित्ररथांद्वारे देशातील समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती आणि सैन्याच्या शक्तीचा शानदार झलक दिसून येईल. ‘शालेय विद्यार्थी लोकनृत्य सादर करतील. कालाहांडीचे मनमोहक लोकनृत्य बजासल, फिट इंडिया मूव्हमेंट आणि स्वावलंबी भारतासाठी मोहिमेची झलकही दिसून येईल.

भारताचे सुवर्ण विजय वर्ष

बांगलादेश सैन्य दलाची १२२ सदस्यांची तुकडीही मंगळवारी राजपथवर कदमताल करताना दिसेल. बांगलादेशातील तुकडी बांगलादेशच्या मुक्ति योद्ध्यांचा वारसा पुढे नेईल, ज्यांनी जनतेवरील अत्याचार आणि अत्याचारांविरोधात आवाज उठवला आणि १९७१ मध्ये बांगलादेशला स्वातंत्र्य दिले’, असं संरक्षण मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.

संचलनात भीष्म रणगाडा

संचलनात भारतीय लष्कर आपल्या मुख्य लढाईचा रणगाडा टी -९० भीष्म, इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल बीएमपी -२ सारथ, ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मोबाइल लॉन्च सिस्टम, रॉकेट सिस्टम पिनाक, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सिस्टम, समविजयसह आपली शक्ती दाखवेल, असं संरक्षण मंत्रालयाने सांगितलं.

आजच्या संचलनात नौदल आपले जहाज आयएनएस विक्रांत आणि नौदल मोहीम १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर चित्ररथ सादर करेल. भारतीय हवाई दल तेजस आणि देशातील विकसित अँटी-टँक डायरेक्टिव्ह मिसाइल ध्रुवस्त्र सादर करेल. राफेल लढाऊ विमानासह आज भारतीय हवाई दलाचे ३८ विमान आणि भारतीय लष्कराची चार विमानं फ्लायपास्टमध्ये सहभाग घेतील. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचा (DRDO) चित्ररथही असेल.

१७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ

महाराष्ट्र, गुजरात, आसाम, तामिळनाडू, उत्तराखंड, छत्तीसगड, पंजाब, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, दिल्ली आणि लडाख यासह १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ असतील.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here