कठुआचे एसएसपी शैलेंद्र मिश्रा यांनी हेलिकॉप्टर कोसळल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. भारतीय लष्कराच्या ध्रुव हेलिकॉप्टर संध्याकाळी ७.१५ वाजता कठुआच्या लखनपूर भागात कोसळलं. या अपघातात दोन पायलट जखमी झाले, त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पण नंतर एकाचा मृत्यू झाला, अशी माहिती तर पोलिस उपायुक्त ओ. पी. भगत यांनी दिली.
कोसळलेले ध्रुव हेलिकॉप्टरने हे प्रशिक्षण उड्डाणावर होते की कुठल्या मोहीमेवर याविषयी माहिती मिळू शकली नाही. तसेच हेलिकॉप्टर कुठून उडले आणि ते कुठे उतरणार होते याचीही माहिती नाही.
ध्रुव हेलिकॉप्टर स्वदेशी
ध्रुव हेलिकॉप्टर हे भारतातच विकसित केले गेले आहे. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) प्रकल्पांतर्गत हे विकसित केले गेले आहे. प्रजासत्ताक दिनी हवाई कसरती करणारी सारंग टीम ध्रुव हेलिकॉप्टर उडवते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times