पाटणा:
नागरिकत्व कायद्याविरुद्ध शाहीन बाग येथे आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनांमागे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी जेएनयू विद्यार्थी नेता इमामला बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. शर्जीलचे वडील बिहारच्या राजकारणात सक्रीय होते आणि त्याचा भाऊदेखील सीएएविरोधी आंदोलनात सक्रीय आहे. कोण आहे शर्जील जाणून घेऊया…

कोण आहे ?

शर्जील इमाम बिहारच्या जहानाबादमध्ये राहणारा आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सेंटर फॉर हिस्टॉरिकल स्टडीजचा तो विद्यार्थी आहे. शर्जीलच्या फेसबुक प्रोफाइलच्या मते त्याने आयआयटी मुंबईतून कॉम्प्युटर सायन्समधूस पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

चर्चेत का आला शर्जील?

अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये सीएए विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात शर्जीलने देशविरोधी वक्तव्य केलं. यानंतर शर्जीलविरोधात आसाम आणि उत्तर प्रदेशमध्ये देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण पेटल्यावर शर्जील फरार झाला होता. पोलीस शर्जील इमामचा कसून शोध घेत होते. तो बिहारच्या आपल्या घरीदेखील नव्हता.

शर्जीलचे वडील कोण होते?

शर्जीलचे वडील अकबर इमाम जनता दल युनायटेडचे नेता होते. २००५ मध्ये त्यांनी जहानाबाद मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र ते या निवडणुकीत हरले होते. शर्जीलचा लहान भाऊ मुजम्मिल इमामदेखील राजकारणात सक्रीय आहे. सीएए विरोधी आंदोलनातही तो सक्रीय आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, फरार होण्याआधी शर्जील इमामला अखेरचा २५ जानेवारीला बिहारमधील फुलवारी शरीफमध्ये एका बैठकीत पाहिलं गेलं आहे.

काय होता शर्जीलचं जबाब

शर्जीलने प्रक्षोभक भाषण केलं होतो. या चिथावणीखोर भाषणात तो म्हणाला होता, ‘आपल्याकडे संघटित लोक असते तर आसामला भारतापासून कायमचं वेगळं केलं असतं.’ पोलिसांनी शर्जीलचा भाऊ मुजम्मिलला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. एनआयएनेदेखील जहानाबाद येथील शर्जीलच्या घरी छापा टाकून कुटुंबीयांची चौकशी केली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here