मुंबई: देशातील शेतकरी आणि सामान्य जनता जेथे सुखी आणि सुरक्षित असते तो देश खरा प्रजासत्ताक म्हणता येतो. आज आपल्या देशाच्या राजधानीत शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. त्याच्या पाठिंब्यासाठी राज्याराज्यांच्या राजधानीतही शेतकऱ्यांचे धडक मोर्चे निघत आहेत. अशा स्थितीत आपल्या देशाला खरेच प्रजासत्ताक म्हणता येईल का?,’ असा प्रश्न करत, शिवसेनेनं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ( Targets Modi Government Over )

कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आजच्या प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेड करून निषेध व्यक्त करणार आहेत. भारत-चीन सीमेवर तणाव आहे. या सगळ्या परिस्थितीवर ‘सामना’च्या अग्रलेखातून चिंता व्यक्त करताना शिवसेनेनं केंद्र सरकारवर टीका केली आहे.

वाचा:

‘आज देशाच्या राजधानीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाबरोबर शेतकऱ्यांची ‘ट्रक्टर रॅली’ निघेल. केंद्र सरकारने मनात आणले असते तर ती सहज टळू शकली असती. मागील दोन महिन्यांपासून हे शेतकरी दिल्लीच्या गारठवणाऱ्या थंडीत आंदोलन करीत आहेत. मात्र चर्चेच्या गुऱहाळापलीकडे काहीही घडलेले नाही. देशातील शेतकऱ्याला ५० ते ६० दिवस रस्त्यावर ठिय्या मांडून बसावे लागते. प्रजासत्ताक दिनी ‘ट्रक्टर रॅली’ काढण्याची वेळ येते. हा प्रश्न निसर्गनिर्मित नाही. केंद्रातील सरकारने एक पाऊल मागे घेतले असते तर आज राजधानीत हे चित्र दिसले नसते, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचा:

भारत-चीन सीमेवर चिनी सैनिकांची घुसखोरी आणि कुरघोड्या सुरूच आहेत. नेपाळपाठोपाठ अरुणाचल प्रदेश सीमेवर चिन्यांनी ‘कृत्रिम’ गाव वसविल्याचे उघड झाले आहे. गलवान खोऱ्याप्रमाणेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित झटापट झाली. हे थांबणार कधी? या प्रश्नाचे उत्तर देशाला मिळणार आहे का? ज्यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यायची ते नेमके अशा प्रश्नांवर बोलत नाहीत. त्यांच्या ‘मन की बात’मध्ये हे ज्वलंत मुद्दे येत नाहीत,’ असा टोला शिवसेनेनं पंतप्रधान मोदी यांना हाणला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here