मुंबई: विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा काल केंद्र सरकारनं केली. राज्यातील ठाकरे सरकारनं यावेळी ९८ मान्यवरांच्या नावांची या पुरस्कारासाठी शिफारस केली होती. त्यात ज्येष्ठ पत्रकार, शिवसेनेचे खासदार व महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे एक शिल्पकार यांच्याही नावाचा समावेश होता, अशी माहिती पुढं आली आहे.

वाचा:

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं ११९ मान्यवरांना जाहीर केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारनं शिफारस केलेल्या ९८ नावांपैकी केवळ एका व्यक्तीला म्हणजेच, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. इतर ९७ नावे केंद्राने विचारात घेतलेली नाहीत.

वाचा:

राज्य सरकारनं ‘पद्मविभूषण’ पुरस्कारासाठी मुकेश अंबानी, सुनील गावस्कर, एचडीएफसी बँकेचे दीपक पारेख यांच्या नावांची शिफारस केली होती. ‘पद्मभूषण’ पुरस्कारासाठी सिंधुताई सपकाळ, ‘सीरम’ इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते मोहन आगाशे, स्कायडायव्हर शीतल महाजन, कै. राजारामबापू पाटील व डॉ. मिलिंद कीर्तने यांची नावे सुचवली होती. ‘पद्मश्री’साठी खासदार संजय राऊत, यशवंतराव गडाख, डॉ. जगन्नाथ दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्यासह ८८ नावांची शिफारस करण्यात आली होती. मात्र, ठाकरे सरकारच्या एकूण शिफारशींपैकी केवळ सिंधुताई सपकाळ यांचं नाव स्वीकारण्यात आलं आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाची ‘पद्मभूषण’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. मात्र, त्यांना ‘पद्मश्री’ जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते

पद्मभूषण: रजनीकांत देवीदास श्रॉफ

पद्मश्री: सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, जसवंतीबेन पोपट, परशुराम गंगावणे

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here