आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचे आधुनिकीकरण करण्यासाठी भागीदार आणि सहयोगींबरोबर काम करण्यास नवीन प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन देखील या अधिकाऱ्यांनी केले. अमेरिकी सरकारचा देशांतर्गत उत्पादनांसंदर्भातील दीर्घकाळचा दृष्टिकोन पुन्हा स्थापित करण्यासाठी बायडेन पावले टाकत आहेत. यामुळे उत्पादनांची गुणवत्ता वाढेल आणि संघटित रोजगार टिकू शकतील, असे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले. अमेरिकेत फेडरल संस्थांकडून अब्जावधी डॉलर खर्च केले जातात. त्यामुळे अमेरिकेतच उत्पादित झालेल्या वस्तू खरेदी केल्यास अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
वाचा:
कोव्हिड साथरोगाच्या काळात अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून १.८ कोटी अमेरिकी नागरिकांनी रोजगार गमावले आहेत. सत्ताग्रहण केल्याच्या तिसऱ्याच दिवशी जो बायडेन यांनी ‘द अमेरिकन रेस्क्यू प्लॅन’ या शीर्षकाखाली आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर केले. आधी जाहीर करण्यात आलेले ६०० डॉलर पुरेसे नसल्याने प्रत्येकी दोन हजार डॉलरची थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे.
वाचा:
बंदी लवकरच मागे
अमेरिकी लष्करात तृतीयपंथीयांना सहभागी होण्यास सध्या बंदी आहे. पेंटॅगॉनचे हे धोरण बदलणाऱ्या कार्यकारी आदेशावरदेखील अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन स्वाक्षरी करणार आहेत. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात एका ट्विटद्वारे तृतीयपंथीयांवर बंदी घालण्याचा आदेश दिला होता
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times