अहमदनगर: ‘दोन तासात संसदेत कायदे मंजूर झाले, हे तर हुकूमशाहीकडे पहिले पाऊल आहे,’ असा घणाघात ग्रामविकास मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी केंद्र सरकारवर केला आहे. ‘१३० कोटींच्या या देशाच्या राजधानीत प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली निघणे हे दुर्दैवी आहे,’ असेही ते म्हणाले.

वाचा:

पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते आज, प्रजासत्ताक दिनी नगरच्या पोलीस परेड ग्राउंडवर ध्वजारोहण झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला.

मुश्रीफ म्हणाले, ‘आज ६० दिवस झाले शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनादरम्यान सुमारे ५० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. वास्तविक हे तिन्ही कायदे रद्द करून हा प्रश्न संपवला पाहिजे होता. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली निघणे, हे फार दुर्दैवी आहे. पंतप्रधानांनी हा प्रतिष्ठेचा किंवा अहंकाराचा प्रश्‍न न करता आंदोलन मिटवणे गरजेचे होते. कृषी कायद्यांना स्थगिती दिली, त्याऐवजी ते रद्द करायला पाहिजे होते व पुन्हा समजूत काढून ते करायचे होते. ते न करता केंद्र सरकारने हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here