कोल्हापूर: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काल सांगली ते कोल्हापूर अशी ट्रॅक्टर रॅली काढली होती. ही रॅली काढल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळं संतापले आहेत. ‘सतेज पाटील यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती, तेव्हा गुन्हा दाखल का केला नाही,’ असा सवाल करतानाच, ‘अशामुळंच काँग्रेस रसातळाला जात आहे,’ असा थेट आरोप शेट्टी यांनी केला आहे.

वाचा:

कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोनाचे नियम न पाळल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. शेट्टी यांच्यासह अन्य २५० कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कारवाईचा शेट्टी यांनी तीव्र निषेध केला आहे. तसंच, काँग्रेसवरही टीकास्त्र सोडलं आहे.

वाचा:

‘चार दिवसांपूर्वी सांगली आणि कोल्हापूरच्या पोलिसांना माहिती देऊनच कालचा ट्रॅक्टर मोर्चा काढला गेला होता. त्यास पोलिसांनीही हरकत घेतली नव्हती किंवा परवानगी नाकारली नव्हती. असं असताना गुन्हा दाखल करण्याचं कारणच काय?, असा प्रश्न शेट्टी यांनी केला. ‘हा ट्रॅक्टर मार्च असल्यानं सोशल डिस्टन्सिंगचा भंग झालेला नाही. याउलट चार दिवसांपूर्वी सांगली व कोल्हापुरात , , सतेज (बंटी) पाटील यांनी मोठे गर्दीचे कार्यक्रम घेतले होते. तिथं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? , बंटी पाटील यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? केवळ सामान्य माणसांवरच पोलीस गुन्हा दाखल करत असतील तर त्यांच्या अकलेची कीव करावीशी वाटते,’ असा संताप शेट्टी यांनी व्यक्त केला.

वाचा:

‘या असल्या भूमिकांमुळं व राजकारणामुळंच काँग्रेस रसातळाला गेलीय. राहिलेले अवशेष तरी त्यांनी जपावेत एवढंच मी सांगू इच्छितो,’ असा टोलाही शेट्टी यांनी काँग्रेसला हाणला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here