ब्रिस्बेन: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत अखेरच्या दोन सामन्यात ऋषभ पंतला वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. प्रथम सिडनी आणि त्यानंतर ब्रिस्बेनमध्ये त्याने धमाकेदार फलंदाजी केली. पंतच्या या खेळीमुळे भारतीय संघाला मोठा फायदा झाला आणि मालिकेत विजय मिळवता आला.

भारताने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयात पंतची महत्त्वाची भूमिका होती. सिडनी कसोटी त्याने ९७ धावा केल्या. ज्या सामन्यात भारताच पराभव होईल असे वाटत होते तेथे पंतने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना केला. त्यानंतर ब्रिस्बेन कसोटीत पंतने नाबाद ८९ धावा केल्या ज्याने भारताने ऑस्ट्रेलियात सलग दुसऱ्यांदा मालिका विजय मिळवला.

वाचा-

पंतला वरच्या क्रमांकावर पाठवण्याची कल्पना कोणाची होती यावर संघाचे फलंदाजीचे कोच यांनी सांगितले की, पंतच्या फलंदाजीचा क्रम बदलून त्याला वरच्या क्रमांकावर पाठवण्याची कल्पना विराट कोहलीची होती. पहिल्या कसोटीनंतर जेव्हा विराट भारताकडे जाणार होता. तेव्हा त्याने ही आयडिया दिली होती.

भारताचा फिरकीपटू आर अश्विनसोबत युट्यूब चॅनलवर बोलताना राठोड यांनी या गोष्टीचा खुलासा केला. हा निर्णय माझा नव्हता. त्यामुळे त्याचे क्रेडिट मी घेऊ शकत नाही. याची सुरुवात पहिल्या कसोटीनंतर झाली. श्रीधरने यासंदर्भात विराट आणि अजिंक्यशी चर्चा केली. विराट जाण्याआधी आम्ही त्यावर चर्चा केली. आम्ही जेव्हा चर्चा करत होते तेव्हा विराटने ही आयडिया दिली होती.

वाचा-

जर आम्ही दोन्ही डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंसह खेळलो तर फायदा होईल. त्यामुळे पंतला ५व्या क्रमांकावर पाठवले गेले. जर विकेट लवकर पडल्या तर पंतला वरच्या क्रमांकावर पाठवले जावे.

सुरुवातीला असा निर्णय झाला की तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला जाईल. पण सिडनी कसोटीत दुसऱ्या डावात मला वाटले की विकेट पडली किंवा नाही तरी ही योग्य वेळ आहे त्याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याची आणि धावा करण्याची.

वाचा-

रवी शास्त्री हे देखील लेफ्ट आणि राइट कॉम्बिनेशनवर विश्वास ठेवतात. यावर चर्चा झाल्यावर रहाणेने देखील सहमती दर्शवली. गाबा कसोटीत पंतला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची इच्छा होती. पण तसे झाले नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here