नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या ”ला हिंसक वळण लागलंय. या आंदोलनादरम्यान दिल्लीतल्या आयकर कार्यालयाजवळ (ITO) एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय.

गोळी लागल्यानं या आंदोलकाचा मृत्यू झाल्याचा दावा उपस्थित प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात येतोय. हा गोळीबार पोलिसांकडून करण्यात आल्याचाही दावा आंदोलकांनी केला आहे.

दीन दयाळ उपाध्याय मार्गावर हा दुर्दैवी प्रसंग घडलाय. या मार्गावर एक ट्रॅक्टरही पलटलेल्या अवस्थेत आढळला आहे. मृत शेतकरी ट्रॅक्टरवर स्वार होता, असं सांगितलं जात आहे.

आयकर कार्यालयाजवळ पोलिसांनी रोखल्यानंतर आंदोलकांकडून मोठा गोंधळ घालण्यात आला. आंदोलनकर्त्यांकडून एका डीटीसी बसची तोडफोडही करण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बेभान झालेले आंदोलनकर्ते डीटीसी बस पलटवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

तसंच याच भागात काही आंदोलकांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला घेरल्याचा एक व्हिडिओही समोर आलाय. काही आंदोलनकर्त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला घेरल्याचं व्हिडिओत दिसतंय. परंतु, काही आंदोलकांच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला.

आयकर विभागानंतर दिल्लीतील प्रसिद्ध लाल किल्ल्यामध्येही काही आंदोलनकर्ते ट्रॅक्टर घेऊन घुसल्याचं समोर आलं. तसंच काही आंदोलकांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर चढून झेंडा फडकावला. आंदोलकांवर नियंत्रण मिळवणं आता पोलिसांना कठिण होऊन बसल्याचं दिसतंय.

पाहा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here