वाचा:
देशातील एकूण ११९ मान्यवरांना केंद्र सरकारनं काल पुरस्कार जाहीर केले. महाराष्ट्रातील सहा व्यक्तींचा पद्म पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्र सरकारनं ९८ नावांची शिफारस केंद्र सरकारकडं केली होती. त्यात राजकारण, समाजकारण, उद्योग, साहित्य, शिक्षण, कला, क्रीडा व चित्रपट क्षेत्रांतील नावांचा समावेश होता. त्यातील केवळ सिंधुताई सपकाळ हे एक नाव केंद्र सरकारनं स्वीकारलं आहे. इतर नावांवर काट मारली आहे. यावरूनही राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे.
वाचा:
‘पद्मभूषण’ जाहीर झालेले रजनीकांत श्रॉफ यांच्या नावाला काँग्रेसनं थेट आक्षेप घेतला आहे. श्रॉफ हे व्यवस्थापकीय संचालक असलेली युनायटेड फॉस्फरस लिमिटेड (यूपीएल) ही कंपनी भाजपशी संबंधित आहेत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे बंधू त्या कंपनीत संचालक आहेत. या कंपनीवर भ्रष्टाचारासह बेकायदेशीर व्यवसायाचे अनेक आरोप असल्याचंही काँग्रेसचं म्हणणं आहे.
संजय राऊत यांनीही आज पत्रकारांशी बोलताना पद्म पुरस्कारांवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘पद्म पुरस्कार विजेत्यांची नावं पाहून आश्चर्य वाटलं. ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत ते पात्र असतील. त्यांचं मी अभिनंदन करतो,’ असं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनसाठी सहकार्य करणारे जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनाही जाहीर झाला आहे. त्यांना पुरस्कार देण्यामागचं कारण हेच असावं, असा अंदाज राऊत यांनी व्यक्त केला आहे.
वाचा:
महाराष्ट्रातून केवळ सहा व्यक्तींची निवड झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘महाराष्ट्र राज्य इतकं मोठं आहे. इथे अनेक लोक वेगवेगळ्या क्षेत्रांत चांगली कामं करत आहेत. असं असताना फक्त सहा जणांनाच पुरस्कार देण्यात आलाय. दरवर्षी किमान १० ते १२ नावं यात असतात. यंदा फक्त सहाच का?,’ असा प्रश्न राऊत यांनी केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times