पुणे: आर्थिक संकटाने ग्रासलेले शहरातील (Auti Rickshaw Drivers) सरकारची उदासिनता पाहून निराश झाले असून सरकारला जाग आणण्यासाठी ते आता पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना (District Collector) आपल्या रक्ताच्या बाटल्या देऊन अनोखे आंदोलन छेडणार आहेत. करोनामुळे पुण्यातील रिक्षा चालकांचा व्यवसाय जवळजवळ ठप्प झाला असून ज्यांनी कर्ज काढून रिक्षा घेतल्या आहेत अशा रिक्षाचालकांचा जीव बँकांचे हफ्ते भरताना मेटाकुटीला आला आहे. सरकार ऑटोरिक्षा चालकांना सावत्रपणाची वागणूक देत असल्याचा चालकांचा सरकारवर आरोप आहे. ( will give to doing )

वसूली एजंटामुळे त्रस्त आहेत रिक्षाचालक

ज्या कंपन्यांकडून रिक्षा चालकांनी कर्जे घेतली आहेत, त्या कंपन्यांचे अधिकारी चालकांना कधीही कार्यालयात बोलावतात. त्यांच्यासोबत दुर्व्यवहार देखील करतात. कधी त्यांना शिवीगाळ देखील करतात, असा रिक्षा चालकांचा आरोप आहे. याकडे सरकारचे मात्र जराही लक्ष नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. करोनामुळे जास्त कुणी रिक्षात बसणे पसंत करत नाहीत. यामुळे आता आम्हाला कुटुंब चालवणे देखील कठीण झाले आहे, असे सांगत त्यात कंपन्यांचे हफ्ते कुठून भरणार, असा सवालही रिक्षा चालक करत आहेत.

५०० रिक्षाचालक करणार विरोध
हे रिक्षाचालक सोमवारी आपले अनोखे आंदोलन छेडणार असून सुमारे ५०० रिक्षाचालक आपल्या रक्ताने भरलेल्या बाटल्या जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत. माझ्या रोजच्या मिळकतीत घट होऊन ती आता ३०० रुपयांवर आली आहे. या पैशातून घर चालवणे अतिशय कठीण झाल्याचे रिक्षा चालक संतोष नेवसकर यांनी सांगितले. वित्त पुरवठा कंपन्यांनी आमच्याशी योग्य व्यवहार करावा यासाठी सरकारने नियमावली तयार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

आमच्या व्यवसायाला मोठा फटका बसल्याचे दुसरे रिक्षाचालक विश्वेश्वर हीरेमठ यांनी सांगितले. सरकार आम्हाला कोणतीही मदत देऊ इच्छित नाही. पार्श्वभूमी न जाणताच सरकार परमीट देत आहे. यामुळे आम्हाला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे हीरेमठ म्हणाले. वित्तपुरवठा कंपन्यांचे अधिकारी आम्हाला बोलावून शिवीगाळ करतात, धमक्या देखील देतात,असेही हीरेमठ यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here