दुबई: दुबईत हिंदूसाठी उभारण्यात येणाऱ्या मंदिराचे बांधकाम सुरू असून पुढील वर्षी दिवाळीत भाविकांसाठी हे मंदिर खुलं करण्यात येणार आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात या मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती. दुबईतील सामुदायिक विकास प्राधिकरणानुसार, शहरातील जेबेल अली भागात गुरु नानक सिंग दरबारजवळ या मंदिराची स्थापना करण्यात येत आहे. दुबईतील सिंधी गुरू दरबारचा हा विस्तार असणार आहे.

सिंधी गुरू दरबार मंदिर हे येथील हिंदूसाठी जुने मंदिर आहे. या मंदिराची सुरुवात १९५० च्या दशकात झाली होती. गल्फ न्यूजसोबत बोलताना मंदिराचे विश्वस्त राजू श्रॉफ यांनी सांगितले की, हे मंदिर संयुक्त अरब अमिरात आणि दुबईतील लोकांच्या विचारांतील खुलेपणाची ओळख आहे. १९५० च्या दशकातील एका लहान मंदिराचे रुपांतर आता ७० हजार चौफुटाच्या मंदिरात होत असून कम्युनिटी सेंटरही उभारण्यात येत आहे. या मंदिराची निर्मिती सरकार, राजघराण्यांची उदारता आणि मदतीशिवाय झाली नसती.

वाचा:

खलीज टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या मंदिरात हिंदूंच्या ११ देवी-देवतांचे घर असणार आहे. या मंदिराची निर्मिती २५ हजार चौफूट जमिनीवर होणार आहे. तर, संपूर्ण परिसर हा ७५ हजार चौरस फूटांच्या विस्तृत भागावर असणार आहे.

वाचा:

वाचा:

मंदिरात चार हजार चौरस फूटांचे एक सभागृहदेखील असणार आहे. जवळपास ७७५ जणांची आसन क्षमता असणार आहे. तर, एक हजार चौरस फूटांचा बहुउद्देशीय एका खोलीदेखील असणार आहे. याची आसन क्षमता १०० आसनी असणार आहे. पुढील वर्षी दिवाळीत हे मंदिर भाविकांसाठी सुरू करण्यात येणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here