ठाणे: वाढीव वीज बिलात नगरिकांना सवलत देण्यात येईल असे आश्वासन देऊन त्याची पूर्तता न केल्याबाबत राज्याचे ऊर्जा मंत्री (Nitin Raut) यांच्यासह ऊर्जा सचिव व बेस्ट महाव्यवस्थापक यांच्यावर आर्थिक फसवणुकीची तक्रार मनसेने शिवाजीपार्क पोलिस ठाण्यात केली आहे. याबरोबर मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी देखील वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. ( has lodged a complaint against energy minister )

वाढीव वीज बिलाबाबत याआधीही मनसेने पोस्टकार्ड आंदोलन केले होते आता पुन्हा एकदा हाच मुद्दा घेत आक्रमक झाली आहे.मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजीपार्क पोलिस ठाण्यात भेट देत शिवाजीपार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना तक्रार दाखल करून घेण्यासाठी निवेदन सादर केले.

करोनाच्या संकटकाळात टाळेबंदी असताना महावितरणकडून वीज मीटर रीडिंगसाठी प्रतिनिधि पाठविण्यात आले नाहीत. या काळात ग्राहकांना वीज वापरांपेक्षा अधिकचे बिल बेस्ट कडून पाठविण्यात आले होते. लॉकडाउनमुळे उत्पन्नाचे स्त्रोत बंद असताना वाढीव वीज बिल पाहून ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तसेच ग्राहकांमध्ये संतापाची लाटही पसरली होती.

याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल कोशयारी यांची भेट घेत वीज बिलाबाबत चर्चा केली होती.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व यांच्याकडे वाढीव बिललंबाबत तक्रारी मांडल्या होत्या तसेच बैठकी देखील घेण्यात आल्या या बैठकीत वीज बिलात कपात करून नगरिकांची दिवाळी गोड करू असे आश्वासन देण्यात आले होते असे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-
सातत्याने याचा पाठपुरावा करूनही दिवाळी नंतर ऊर्जा मंत्र्यांनी घुमजाव केल्याचे मनसेचे म्हणणे आहे. वीज बिलात सवलत न देता मीटर रीडिंग नुसार बिल भरावेच लागेल असे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांची एकप्रकारे आर्थिक फसवणूकच करण्यात आली. या कारणामुळेच तक्रार दाखल केली असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here