म.टा.प्रतिनिधी, नागपूर

यापूर्वी विदर्भाकडे कदाचित दुर्लक्ष झाले असेल मात्र विकासाच्या बाबतीत यापुढे असे होणार नाही. विकासाचा वाघ आता मजबुतीने पावले टाकेल आणि विरोधकांची दाणादाण उडेल, असे प्रतिपादन () यांनी केले. नागपुरातील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणिसंग्रहालय उद्यानाचे (Balasaheb Thackeray Gorewada Zoological Gardens) उद्घाटन मंगळवारी मुख्यमंत्र्य़ांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

विदर्भाशी आमचे रक्ताचे नाते आहे आणि त्यामुळे कुणी आम्हाला विदर्भप्रेम शिकवू नये. येथील विकासाला चालना देण्यासाठीच काही दिवसांपूर्वी गोसेखुर्द प्रकल्पाला भेट दिली. गोरेवाडासारखा महत्वपूर्ण प्रकल्पही आता सुरू होणार आहे. आदिवासी समाजाच्या मुद्द्यावरुन गेले काही दिवस अस्वस्थता आहे. मात्र, आदिवासींची संस्कृती आणि इतिहास यांचे दर्शन घडविणार गोंडवाना थीम पार्क याच प्रकल्पात उभारला जाईल. मसाई मारा प्रकल्पात तेथील संस्कृती पर्यटकांना जवळून बघता येते. या थीम पार्कमुळे जगभरातून गोरेवाडा येथे येणार्‍या जगातील पर्यटकांना आदिवासी संस्कृतीबद्दल समजून घेता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. येत्या १ मे रोजी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. इतर मान्यवरांनीही यावेळी मनोगत वक्त केले.

उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांनी येथील इंडियन सफारीचा आनंद घेतला.

फडणवीस, मुनगंटीवार यांचा उल्लेख नाही

गेल्या दोन दशकांपासून रखडलेल्या गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाच्या कामाला देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात वेग आला होता. तत्कालिन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या प्रकल्पाला बळ दिले होते. आजच्या कार्यक्रमादरम्यान या दोन्ही नेत्यांचा नामोल्लेख टाळण्यात आला. केवळ महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांनी आपल्या प्रास्ताविकात फडणवीस यांचा उल्लेख केला.

क्लिक करा आणि वाचा-

या कार्यक्रमात व्यासपीठावर गृहमंत्री अनिल देशमुख, वनमंत्री संजय राठॊड, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, खासदार कृपाल तुमाने, महापौर दयाशंकर तिवारी, जिल्ह्यातील आमदार, मुख्यमंत्र्यांचे सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, वन विभाग प्रमुख एन. रामबाबू, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन, वन्यजीव विभाग प्रमुख नितीन काकोडकर, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे आयुक्त बी. राधाकृष्णन तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here