नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याविरूद्ध आयोजित ( ) ट्रॅक्टर परेड दरम्यान, दिल्लीतील आयटीओ येथे ट्रॅक्टर पलटी ( ) झाल्याने ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या ( ) एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू ( ) झाला. मृत शेतकर्‍याशी संबंधित माहिती गोळा केली जात आहे. ट्रॅक्टर पलटी झाल्याने त्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकऱ्याने नियोजीत मार्ग सोडला होता आणि गाझीपूरच्या सीमेवरून प्रवेश करणाऱ्या इतर शेतकऱ्यांसोबत आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ट्रॅक्टर अतिशय वेगात चालवण्यात येत होता. यामुळे ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. काही शेतकरी तिथेच धरणे आंदोलनाला बसले आणि पोलिसांनी गोळी मारली, असा आरोप केल्याचं पोलिसांनी सांगितलं. पण आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव नवनीत सिंह आहे. मृत शेतकरी हा नवनीत हा उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातल्या डिबडीबा गावचा रहिवासी होता. हे गाव उत्तराखंडच्या बाजपूर सीमेला लागून आहे. नवनीत सिंगचं नुकतेच लग्न झालं होतं. परेडमध्ये सहभागी असलेली व्यक्ती ट्रॅक्टर चालवत होती आणि ट्रॅक्टर पलटी झाल्याने तो त्याखाली दाबला गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

राजधानी दिल्लीत अनेक ठिकाणी पोलिसांसोबत आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांची झटापट झाली. अनेक शेतकरी नियोजित मार्ग सोडून ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या परिसरात आणि दिल्लीतील आयटीओ भागात दाखल झाले. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. आयटीओ भागात लाठ्याकाठ्या घेऊन अनेक आंदोलनकर्ते पोलिसांवरच धावून गेल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. ट्रॅक्टरच्या सहाय्याने पोलिसांची बस ढकलताना दिसून आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here