कल्याण: (Shiv Sena) आणि भारतीय जनता पक्षामधून (BJP) विस्तव जात नसला तरी शिवसेनेचे खासदार आणि राज्याचे मंत्री (Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shirkant Shinde) यांनी मात्र कल्याणमधील भाजपच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावत वेगळा संदेश दिला आहे. भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमालाशिंदे यांनी अचानक हजेरी लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. शिंदे यांनी या कार्यक्रमाला नुसतीच हजेरी लावली नाही, तर ‘सोशल डिस्टन्सिंग कितीही असले तरी देखील आपल्या एकमेकांमधील डिस्टन्स वाढायला नको’, असा संदेशही त्यांनी उपस्थित नेते आणि कार्यकर्त्यांना दिला. शिंदे आपल्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे पाहून भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह सर्वच उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटले. (shiv sena mp participated in in )

कल्याणमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या पत्रीपुलाच्या जवळच असलेल्या चौकाचे नामकरण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे करण्यात आले. हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भाजप आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

या कार्यक्रमात सहभागी होण्याचा आपला कोणताही इरादा नव्हता. अगदी शेवटच्या क्षणी आपण या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे शिंदे म्हणाले. आपण पश्चिम येथील एका कार्यक्रमाला जात होतो. मात्र येथे मला भाजप आमदार रवींद्र चव्हाण दिसले. त्यांना पाहूनही पुढे जाणे मला योग्य वाटले नाही आणि म्हणूनच मी थांबलो असे शिंदे यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

या वेळी शिंदे यांनी भाषणही दिले. शिंदे म्हणाले की, ‘मला बोलावले नसले तरी देखील मी आलो. आपण सोशल डिस्टन्सिंग कितीही पाळत असलो, तरी देखील एकमेकांमध्ये डिस्टन्स ठेवू नका.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here