सातारा : राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेले सातारचे सुमारे २५ आंदोलक बॉर्डर येथे सुखरूप असून, दिल्लीत प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना पानेसर येथे रोखण्यात आल्याची माहिती आंदोलकांनी दिली. दरम्यान, यांची मोठी प्रतिमा आणि यांच्या वेशभूषेतील कलावंत ही महाराष्ट्राच्या ट्रॅक्टरची आकर्षण केंद्रे ठरली, असेही त्यांनी सांगितले. ( Delhi )

वाचा:

आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११ वाजता शहाजहांपूर बॉर्डरवरून शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड सुरू झाली. तत्पूर्वी योगेंद्र यादव यांनी सर्वांना सूचना दिल्या. शिस्त पाळावी, धुडगूस घालू नये, ट्रॅक्टरवर संगीत लावू नये, प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये पाचच लोकांनी बसावे, अशा या सूचना होत्या. सील केलेली बॉर्डर पोलिसांनी रॅलीसाठी खुली करून दिली. रस्ता अडविण्यासाठी ठेवलेले मोठमोठे ब्लॉक आणि अन्य सामग्री क्रेनने हलविण्यात आली. सीमा खुली केल्यानंतर आंदोलकही सुखावले.

वाचा:

शेतकरी आंदोलनादरम्यान शहीद झालेल्यांना अभिवादन करणारा ट्रॅक्टर परेडमध्ये सर्वांत पुढे होता. त्यानंतर सर्व राज्यांचे ट्रॅक्टर होते. यात , हरयाणा, पंजाब, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार आदी राज्यांचा समावेश होता. आंदोलकांनी त्या-त्या राज्याची संस्कृती दर्शविणारे रंगबिरंगी पोशाख परिधान केले होते. महाराष्ट्राच्या ट्रॅक्टरकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी प्रतिमा ट्रॅक्टरच्या अग्रभागी होती. सातारच्या स्वाती बल्लाळ या सावित्रीबाई फुले यांचा पेहराव करून ट्रॅक्टरमध्ये बसल्या होत्या. त्या-त्या राज्यातील लोकगीते गायिली जात होती.

वाचा:

शहाजहांपूरपासून ५० किलोमीटरवर पानेसर येथे ही रॅली अडविण्यात आली. दिल्लीतील घटनांची माहिती पोलिसांनी आंदोलकांना दिली. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यातून गेलेल्यांमध्ये अॅड. , शैलजा जाधव, माया पवार, कैलास जाधव, सविता बनसोडे, उमा कांबळे, सिंधू कांबळे, प्रा. संजीव बोंडे, प्रतिभा शिंदे, हृषिकेश पाटील आदींचा समावेश आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here