नवी दिल्लीः दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारामागे ( ) पंजाबी अभिनेता आणि गायक ( ) याचं नाव पुढे येत आहे. दीप सिद्धूने आंदोलकांना हिंसाचारासाठी चिथावलं, असा आरोप शेतकरी नेते करत आहेत. दीप सिद्धूने आंदोलकांना चिथावलं आणि त्यांची दिशाभूल केली, असा आरोप भारतीय किसान युनियन हरयाणाचे प्रमुख गुरनामसिंग चधुनी ( ) यांनी केला आहे.

दीप सिद्धूनेच आंदोलकांना लाल किल्ल्यावर नेले. शेतकरी तिथे जाण्याच्या बाजूने कधीच नव्हते. गुरनामसिंग चधुनी यांच्यासह स्वराज पक्षाचे योगेंद्र यादव ( ) यांनीही दीप सिद्धू यावर आरोप केला आहे. दीप सिद्धू अनेक दिवसांपासून आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करत होता. तो भाजपशी संबंधित आहे, असा आरोप यादव यांनी केला.

दीप सिद्धू हा निवडणुकीत भाजप खासदार सनी देओल एजंट होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्याचे बरेच फोटो आहेत. याबाबत आम्ही दिल्ली पोलिसांना बर्‍याचदा सांगितलं होतं. पण कोणतीही कारवाई झाली नाही. त्याचे फोटो समोर येऊनही त्याला अटक करण्यात आलेली नाही. यामुळे दिल्लीच्या हिंसाचारामागे षडयंत्र असण्याची शक्यता आहे, असं योगेंद्र यादव म्हणाले.

कॉंग्रेसचे लोकसभेचे खासदार रवनीतसिंग बिट्टू यांनीही असाच काहीसा दावा केला आहे. दीप सिद्धू यानेच लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला. सिख फॉर जस्टिस (SFJ) या बंदी घातलेल्या संघटनेचा तो सदस्य आहे. घटनेनंतर दीप सिद्धूने फेसबुक लाइव्ह केलं. आम्ही केवळ लाल किल्ल्यावर ‘निशान साहिब’ (झेंडा) फडकावला आहे. आणि विरोध करणं हा आमचा हक्क आहे. आम्ही तिरंगा काढला नाही, असं तो दीप सिद्धू म्हणाला.

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर परेड दरम्यान पोलिस आणि शेतकरी यांच्यात बर्‍याच ठिकाणी धुमश्चक्री उडाली. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या अटींसह ट्रॅक्टर परेड घेण्यास परवानगी दिली होती. पण मंगळवारी सकाळी शेतकरी ट्रॅक्टरसह दिल्लीच्या हद्दीत घुसले आणि त्यांनी सर्व नियम मोडले. आंदोलकांनी बेरीकेडिंगची जोरदार तोडफोड केली. आयटीओवरून सर्वप्रथम आंदोलन करणारे शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. यानंतर, आंदोलकांनी पोलिसांना चकवा देत लाल किल्ल्यात प्रवेश केला. तिथे त्यांनी झेंडा फडकवला.

NIA ने पाठवले समन्स
दीप सिद्धू आणि त्याचा भाऊ मनदीप यांना एनआयएने चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं होतं. दीप सिद्धू हा शेतकरी आंदोलनात सहभागी आहे आणि शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. शीख फॉर जस्टिस या फुटीरतावादी संघटनेविरोधात दाखल केलेल्या खटल्या प्रकरणी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही भावांची चौकशी केली होती.

शीख फॉर जस्टिस नावाच्या कोणत्याही संघटनेशी आपला काहीही संबंध नाही, असं दीप सिंग सिद्धू त्यावेळी म्हणाला होता. एनआयएमार्फत समन्स पाठवून जे शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहेत त्यांना धमकावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप दीप सिद्धूने केला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here