नाशिक: मालेगाव-देवळा रस्त्यावर एसटी बस-अपे रिक्षा यांच्यात जोरदार धडक होऊन दोन्ही वाहने एका विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात चालकासह २० प्रवासी ठार झाले आहेत. तर ३५ जण जखमी असून दोन जण बेपत्ता आहेत. जखमींना उपचारासाठी स्थानिक देवळा ग्रामीण रुग्णालय तसेच मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालक पी. एस. बच्छाव ठार झाले असून वाहक कमल लक्ष्मण राऊत या जखमी आहेत.

एसटी बसचा टायर फुटल्याने बसने अपे रिक्षाला धडक दिली. कळवण डेपोची उमराणे – देवळा बस आणि रिक्षा दोन्ही विहिरीत कोसळल्या. धोबीघाटाजवळील देश-विदेश हॉटेलजवळ हा अपघात झाला. बसमध्ये एकूण ४३ प्रवासी होते. यात सात लहान मुलांचा समावेश आहे. घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. मदतकार्यही वेगाने सुरू होते.

मृतांची नावे :

पी. एस. बच्छाव (चालक)
कल्पना योगेश वन्से (रा. निंबायती, निमगाव)
शिवाजी रुपला गावित (रा. कळवण)
चंद्रभागाबाई उगले (रा. सरस्वतीवाडी)
अंकुश संपत निकम (रा. वाखारवाडी)
अलका दिगंबर मोरे (रा. खर्डे)

अन्य मृतांची ओळख पटलेली नाही. सर्व मृतदेह देवळा ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

जखमींची नावे :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here