नवी दिल्लीः केंद्र सरकार १ फेब्रुवारीला २०२१-२२ चा वार्षिक अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यात आता ५ दिवस उरले आहेत. यापूर्वी दोन आंतरराष्ट्रीय संघटनांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल चांगली बातमी दिली आहे. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) वर्ष २०२१ मध्ये ( ) भारतीय अर्थव्यवस्थेत ११.५ टक्के ( ) आणि संयुक्त राष्ट्रांनी (UN) ७.३ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे.

भारत २०२१ मध्ये दोन आकड्यात विकास करणारा जगातील पहिला देश असेल. करोना संकटातही भारत हे साध्य करू शकतो, असं आयएमएफने म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला जोरदार पुनरागमन होत आहे. पण करोनामुळे २०२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत ८ टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, असं आयएमएफने मंगळवारी जाहीर केलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुकमध्ये असे म्हटलं आहे.

भारत चीनला मागे टाकणार

आगामी आर्थिक वर्षात विकासदर वाढीच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकेल. आयएमएफ आऊटलुकच्या मते, २०२१ मध्ये भारताची आर्थिक वाढ ११.५ टक्के होईल, तर चीनची आर्थिक वाढ ८.१ टक्के होईल. त्याखालोखाल स्पेन (९.९ टक्के) आणि फ्रान्सचा ५.५ टक्के असेल. आयएमएफने २०२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ८ टक्क्यांनी घसरणार, अस आयएमएफने म्हटलं आहे. चीनचा २.३ टक्के राहील. २०२० मध्ये सकारात्मक आर्थिक विकास असलेला चीन हा जगातील एकमेव देश असेल.

२०२२ मध्ये ६.८ टक्के विकासदर वाढ

आयएमएफच्या अंदाजानुसार २०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकासदर हा ६.८ टक्के आणि चीनचाआर्थिक विकासदर हा ५.६ टक्के असेल, असा अंदाज आहे. सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या जगातील विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये भारत अव्वल स्थानावर असेल. करोनाशी सामना करण्यासाठी भारताने अधिक चांगली पावलं उचलावीत, असं गेल्या महिन्यात आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिया म्हटल्या होत्या.

संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार – २०२१ मध्ये विकासदर वाढ ७.३ टक्के

यूएनने ‘जागतिक आर्थिक स्थिती आणि संभावना २०२१’ या नावाचा एक अहवाल मंगळवारी जाहीर केला. २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर हा ७.३ टक्के असेल, असं अहवालात म्हटलं आहे. करोना विषाणूमुळे वर्ष २०२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत ९.६ टक्के टक्क्यांनी घसरली, असं अहवालात म्हटलं आहे. वित्तीय आणि आर्थिक प्रोत्साहन देऊनही जीडीपी घसरला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here