मुंबई: राज्यात (Coronavirus) मृत्यू आणि नवीन रुग्णांचे प्रमाण यात आजही मोठी घट पाहायला मिळाली असून आज ४७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात २ हजार ४०५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर २ हजार १०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.(Coronavirus In Maharashtra Latest Update Today )

हाती आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण १९ लाख १७ हजार ४५० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.२४ टक्के इतके झाले आहे ही दिलासा देणारी बाब आहे.

राज्यात आज एकूण ४७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ३० इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३ टक्के इतका आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४३ लाख १५ हजार २२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख १३ हजार ३५३ म्हणजेच १४.०६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ८४ हजार ९४४ व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत. तर, २ हजार ६१३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

राज्यातील सक्रिय (अॅक्टिव्ह) रुग्ण
राज्यात आजच्या घडीला एकूण ४३ हजार ८११ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत एकूण ५ हजार ७१७ इतके अॅक्टिव्ह रुग्ण असून ठाण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या मुंबईहून अधिक म्हणजेच ७ हजार ५३८ इतकी आहे. तसेच पुण्यात ही संख्या १२ हजार ४८२, नागपूरला ३ हजार ८६८, औरंगाबादला ५६८, कोल्हापूरला १९० इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर राज्यात सर्वात कमी अॅक्टिव्ह रुग्ण असलेला जिल्हा गडचिरोली हा आहे. गडचिरोलीत ७७ सक्रिय रुग्ण आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here