नगर: दिल्लीतील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहून ज्येष्ठ समाजसेवक व्यथित झाले आहेत. ‘प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपणच धुडगूस घालून आपल्या मालमत्तेची हानी करावी, हे फारच दुर्दैवी आहे,’ अशी प्रतिक्रिया हजारे यांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत विविध प्रश्नांवर वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या सरकारविरुद्ध छोटी मोठी आंदोलने करणाऱ्या हजारे यांच्या आंदोलनात हिंसाचाराला थारा नव्हता. त्यामुळे या हिंसाचारावर हजारे यांची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरते. ( )

वाचा:

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हजारे यांनीही ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीमध्ये उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्याची तयारी सध्या सुरू आहे. याशिवाय दिल्लीतील शेतकऱ्यांनी आज काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला पाठिंबा देण्यासाठी येथेही काढण्यात आली होती. रॅलीला हजारे यांनीच हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर हजारे पुन्हा आंदोलनाच्या तयारीत व्यस्त असताना दिल्लीतील हिंसाचाराची बातमी आली. त्यावर प्रतिक्रिया देताना हजारे म्हणाले, ‘आज दिल्लीत जे घडलं ते नक्कीच क्लेशदायक आहे. आज प्रजासत्ताक दिन आहे. आजच्या दिवशी प्रजेची सत्ता आली. प्रजा मालक झाली. अन् अशा पवित्र दिवशी आपणच धूडगूस घालून आपल्या मालमत्तेची हानी करावी, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करावे हे फारच दुर्दैवी आहे. मी चाळीस वर्षे आंदोलन करीत आहे. आंदोलन म्हणजे सत्याग्रह. सत्याचा आग्रह हा शांततेच्या मार्गाने, अहिंसक मार्गाने करावा लागतो. हिंसेमुळे आंदोलन बदनाम होते. गालबोट लागते,’ असेही हजारे यांनी म्हटले आहे.

वाचा:

या आंदोलनाला सुरुवातीच्या टप्प्यातच हजारे यांनी पाठिंबा दिला होता. त्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणही केले होते. त्यानंतर स्वत: हजारे यांनी स्वतंत्र आंदोलन पुकारत आपल्या जुन्या मागण्या पुन्हा पुढे आणल्या आहेत. हजारे यांचे आंदोलन जवळ आलेले असताना दिल्लीत हा हिंसाचार झाला.

दरम्यान, हजारे यांनी उपोषणाच्या इशाऱ्याची आता राज्य सरकारकडूनही दखल घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांनी आज सायंकाळी राळेगणसिद्धी येथे जाऊन हजारे यांची भेट घेतली. त्यांच्याशी आंदोलनासंबंधी चर्चा केली. हजारे आणि राळेगणसिद्धीमधील बंदोबस्ताचीही पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वाचा:

चट मंगनी पट ब्याह, असे हवे…

आंदोलक हिंसक का बनले, यासंबंधी हजारे म्हणाले, ‘हे असे का घडावे, हे कोडेच आहे. हा जो धुडगूस घातला तो आंदोलकांनी घातला की त्यात दुसऱ्या कोणत्या शक्ती शिरल्या आहेत, हे सांगणे अवघड आहे. मात्र, अशा प्रवृत्ती देशाला घातक आहेत. आमचे आंदोलन झाले तेव्हा लाखो लोक रस्त्यावर उतरले होते. त्यात एकही दगड उचलला गेला नाही. कारण आंदोलन सुरू करण्यापूर्वी आपण सूचना देत असतो की हिंसाचार होता कामा नये, जर हिंसाचार झालाच तर त्या क्षणी आंदोलन थांबविले जाईल. यापुढे होणाऱ्या आंदोलनातही हेच सूत्र पाळले जाईल. अशा पद्धतीच्या आंदोलनांची जगभर चर्चा झाली होती. मात्र, आज दिल्लीत जे झाले, त्यामुळे या प्रतिमेला कलंक लागला आहे. सरकारने आंदोलने रखडत ठेवू नये. दहा-बारा वेळा चर्चा आणि बैठका घेतात हे अति झाले. जन इच्छाशक्ती आहे, तर तातडीने तोडगा काढला पाहिजे. चट मंगनी पट ब्याह, असे हवे. आंदोलन रखडत गेल्याने आंदोलक शेतकरी चिडले असावेत. त्यामुळे हिंसाचाराला ते प्रवृत्त झाले असावेत. सरकार म्हणजे कोणी बाहेरची यंत्रणा नाही. तेही आपलेच लोक आहेत. त्यामुळे चर्चा करून आंदोलनावर मार्ग काढले पाहिजेत. चर्चेतून प्रश्न सुटतात, यावर आमचा विश्वास आहे. तशीच चर्चा दिल्लीतील आंदोलक आणि सरकारमध्ये झाली पाहिजे. पण ही चर्चा खूप लांबणारी नव्हे तर मर्यादित हवी. आमच्या आंदोलनातही हीच अपेक्षा ठेवतो.’

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here