मुंबई : करोना प्रमाणे गुन्हेगारी हा देखील एक प्रकारचा व्हायरस असून त्याला धडा शिकवणारी लस माझ्या आणि महाराष्ट्र पोलिसांच्या रूपाने उपलब्ध आहे. आम्हा सर्वांना त्याचा सार्थ अभिमान आहे. डोळ्यांना दिसत नाही. अशा या न दिसणाऱ्या शत्रू संगे आपले युद्ध अधिक सक्षमतेने आता सुरू झाले आहे, असे विधान मुख्यमंत्री यांनी आज केले. ( CM )

वाचा:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दक्षिण विभाग ठाण्याचे प्रत्यक्षात उद्घाटन केले तर पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण आणि मध्य विभाग सायबर पोलीस ठाण्यांचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन केले. याच कार्यक्रमात ९४ पोलीस ठाण्यातील स्वागत कक्षांचे ऑनलाइन उद्घाटनही करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन म्हटले की, या मुहूर्तावर राज्य घटनेचे, देशाच्या नागरिकांचे, कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या सर्वांना माझा सलाम आहे. मुख्यमंत्री लोकप्रिय होत असेल तर त्याचे मानकरी पोलीस सुद्धा आहेत, कारण कारभार कोण चालवतो यापेक्षा तो कसा चालतो याला जनता महत्त्व देते.

वाचा:

सायबर सेलसोबतची मूळ पोलीस ठाण्याची इमारत १०३ वर्षाची असली तरी ती मजबूत आहे व त्यात आधुनिकतेकडे पाऊल टाकणारे सायबर पोलीस ठाणे आज सुरू झाल्याने आधुनिकता आणि परंपरेचा मिलाफ झाला आहे असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, ‘डोळ्यात तेल घालून काम करणे म्हणजे काय असते याची प्रचिती पोलिसांकडे पाहिल्यानंतर येते. पोलीस घड्याळ हातात घालून काम करतो पण त्याला काळ वेळेचे भान न ठेवता काम करावे लागते. गुन्ह्यांचे स्वरूप बदलते आहे. मोबाइल फोनचा दुरुपयोग वाढतो आहे, आपल्याच साधनांचा उपयोग करून गुन्हे करणारी टोळी कार्यरत होत आहे. जगाच्या पाठीवरचा कुणीही कुठेही बसून आपल्या घरातील माहिती, पैसे आणि इतर गोष्टींची चोरी या माध्यमातून करू शकतो, असे असले तरी या गुन्हेगारी विश्वात धाक बसवणारे मुंबई हे देशातील पहिले शहर असेल, याबद्दल मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा मला अभिमान आहे.’

वाचा:

कुणी कितीही बदनामी केली तरी बेचैन होऊ नका, त्यांचा बुरखा तुम्ही फाडला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, तुमचा अभिमान राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आहे. सरकार म्हणून ताकदीने तुमच्या मागे आम्ही उभे आहोत. पोलिसांच्या घराचा प्रश्न आपण संपूर्णत: मार्गी लावणार आहोत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी जे जे करता येईल ते ते करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे, यासाठीचे आवश्यक असणारे प्रस्ताव समोर आणा आपण त्याला मंजुरी देऊ, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. पोलीस स्वागत कक्षाच्या माध्यमातून वेगळा अनुभव नागरिकांना अनुभवता येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गुन्हेगार आणि गुन्हेगारीवर जरब बसवायची असेल तर नागरिकांना पोलिसांची भीती वाटू नये. दरारा आणि दहशत यामध्ये फरक आहे. गुंडाची असते ती दहशत आणि पोलिसांचा असतो तो दरारा. उंदराच्या बिळात लपलेल्यांना शोधून काढून फासावर लटकवण्याचे काम मुंबई पोलिसांनी केले आहे. हे काम जनतेचे आर्शीवाद घेण्याचे काम आहे. या आशीर्वादाच्या बळावर आपण असेच उत्तम काम करत राहा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवाहन केले.

कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे गृहमंत्री , गृहराज्यमंत्री सतेज पाटील सहभागी झाले होते. याशिवाय मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचारीही कार्यक्रमास उपस्थित होते.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here